शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
4
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
5
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
6
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
7
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
8
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
9
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
10
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
11
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
12
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
13
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
14
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
15
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
16
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
17
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
18
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
19
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
20
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी

राज्य शासन पोलिसांच्या पाठीशी

By admin | Updated: January 13, 2015 05:50 IST

शहरातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी राज्य शासन पोलिसांच्या पाठीशी राहील. कोणत्याही परिस्थितीत गुंडागर्दी आणि टोळ्यांचे राज्य पुण्यात निर्माण होऊ द्यायचे नाही

पुणे : शहरातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी राज्य शासन पोलिसांच्या पाठीशी राहील. कोणत्याही परिस्थितीत गुंडागर्दी आणि टोळ्यांचे राज्य पुण्यात निर्माण होऊ द्यायचे नाही. त्यासाठी पोलीस जे जे काम करतील, त्यासाठी शासन पाठीशी राहील, असे आश्वासन मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिले. पुणे शहर पोलिसांनी आयोजित केलेल्या अत्याधुनिक वाहनांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, पोलीस आयुक्त सतीश माथुर, सहआयुक्त संजय कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. शहाजी सोळुंके, प्रकाश मुत्याळ, अब्दुर रहमान आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.पुणे शहर पोलीस आयुक्तालयाला ५0 वर्षे पूर्ण होत आहेत, ही बाब अभिमानाची आहे. पोलिसांनी पुणेकरांना ५0 वर्षे सुरक्षित असे वातावरण दिले आहे. सुवर्णवर्षाच्या निमित्ताने सुवर्णजयंती पोलीस आयुक्तालयाची पोलीस आयुक्त सतीश माथुर यांनी केलेली मागणी पूर्ण करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पोलिसांच्या नूतन इमारतीसाठी पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पुढाकार घेऊन त्याच्या प्रशासकीय मान्यता आणि बजेटसाठी लक्ष घालावे, असे आवाहनही त्यांनी केले. अत्याधुनिक वाहनांमुळे पोलिसांमधली सकारात्मकता वाढण्यास मदत होणार असल्याचेही ते म्हणाले. या वेळी बोलताना पोलीस आयुक्त सतीश माथुर म्हणाले, ‘‘पुणे शहर पोलीस दलाची स्थापना १ जुलै १९६५ रोजी झाली होती. त्यानुसार हे वर्ष सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. आयुक्तालयाची प्रशासकीय इमारत अपुरी आहे. तसेच वाहतुकीचा प्रश्न जटिल झालेला असून, वाहतूक पोलिसांसाठी नवीन इमारतीची आवश्यकता आहे. यासोबतच शिवाजीनगर येथील इमारती १00 वर्षे जुन्या झालेल्या आहेत. या इमारती पाडण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या आहेत. त्यामुळे आयुक्तालयाच्या इमारतीसाठी १३ कोटी, वाहतूक इमारतीसाठी १२ कोटी व मुख्यालयातील बांधकामासाठी ४५ कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आले आहेत.’’ (प्रतिनिधी)