शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

उरळी कांचन येथील दारु भटट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 16:08 IST

हवेली तालुक्यातील शिंदवणे व सोरतापवाडी परिसरातील अनाधिकृत गावठी दारूभट्ट्यांवर दारु भटट्यांवर राज्य शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी छापा टाकण्यात आला. ही कारवाई बुधवारी (दि.२८) रोजी मध्यरात्री करण्यात आली. 

ठळक मुद्दे पुणे उत्पादन शुल्क विभागाची उपायुक्त अर्जुन ओव्हाळ यांच्या मार्गदर्खाली कारवाई भट्टी मालक व जप्त केलेल्या वाहन मालकांना फरारी घोषित करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल

उरळी कांचन येथील दारु भटट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा उरुळी कांचन :  हवेली तालुक्यातील शिंदवणे व सोरतापवाडी परिसरात अनाधिकृत गावठी दारूभट्ट्यांवर राज्य शुल्क विभागाच्या वतीने  छापा टाकण्यात आला. त्यात १७ हजार १५० लिटर तयार दारू,४३ हजार लिटर दारू तयार करण्याचे रसायन ,१० वाहने व इतर साहित्य असा एकूण २२ लाख ४८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि.२८) रोजी मध्यरात्री करण्यात आली.    गेल्या काही वर्षात जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात गावठी दारू साठा जप्त करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी एक वर्षापूर्वी पदभार स्वीकारल्यानंतर प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मटका, जुगार, दारू इत्यादी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले होते. त्या आदेशानुसार, ग्रामीण पोलिसांनी आपापल्या हद्दीतील अवैध धंदे बंद झाल्याचा लेखी अहवाल पोलीस अधिक्षकांना दिले होते. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने बुधवारी करण्यात आलेल्या कारवाईने पोलीस अधिकाºयांनी पाठविलेला लेखी अहवालात त्रुटी असल्याचे निष्पन्न झाले आहे.     हवेली तालुक्याच्या पूर्व भागात शिंदवणे व सोरतापवाडी गावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गावठी दारू तयार केली जात असल्याची खात्रीशीर माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्याआधारे पुणे विभागीय उपायुक्त अर्जुन ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने बुधवारी या ठिकाणांवर कारवाई करीत मोठा साठा हस्तगत केला.     या कारवाईमध्ये पाच ठिकाणी दारू भट्ट्या सुरु होत्या. पोलीस आल्याचे पाहून भट्टी मालक व भट्टीवर काम करणारे कामगार अंधाराचा फायदा घेवून पसार झाले. याठिकाणी ३५ लिटरचे ५४ कॅन व ४३ हजार लिटर रसायन आणि मळीने भरलेले बॅरल आढळून आले. मात्र , दारूच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाºया ५ दुचाकी जप्त करण्यात आल्या. सबंधित भट्टी मालक व जप्त केलेल्या वाहन मालकांना फरारी घोषित करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.        फोटो ओळ - शिंदवणे व सोरतापवाडी गावच्या हद्दीत जेसीबीच्या सहाय्याने गावठी दारूभट्टया व दारू साठविण्याच्या टाक्या उध्वस्त करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी.

टॅग्स :uruli kanchanउरुळी कांचनPuneपुणे