आंबेठाण : अडाणी, गुन्हेगार लोक राजकारणात आल्याने राजकारण खराब होत आहे. अशा वेळी चांगल्या व सुसंस्कृत माणसांची राजकारणात गरज आहे, असे मत राजगुरुनगर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष संतोष गाढवे यांनी व्यक्त केले.चांदूस येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘राजकारणी माणसांवर फारशा कविता केल्या जात नाहीत. शरद बुट्टे-पाटील यांचे कर्तृत्व चांगले आहे. मात्र, आस्था नसलेल्या लोकांनी त्यांना लक्ष्य केले आहे. आपण कुणाच्याही आमिषाला बळी न पडता चांगल्या माणसांच्या सोबत राहायला हवे.’’या वेळी प्रवीण कारले, राजेंद्र कारले या तरुणांनीही ‘विकासाच्या पाठीमागे चला, आपले मत विकू नका’ असे आवाहन केले. चांदूस गाव या वेळी विकासाची कास धरून बुट्टे-पाटील यांच्या मागे उभे राहील, असे सांगितले. या वेळी सरपंच नयनाताई कारले, उपसरपंच अण्णा कारले, सुरेश कारले, सुनील कार्ले, अशोक बढे, अशोक आरुडे, आनंद बिडवे, अंकुश कारले, संजय सांडभोर आदी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसंत कारले यांनी आभार मानले. (वार्ताहर)
सुसंस्कृत नेतृत्वाच्या मागे उभे राहा
By admin | Updated: February 14, 2017 01:37 IST