शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 23:18 IST

बारामतीत आंदोलन : नगरपालिका प्रशासनाचा निषेध

बारामती : येथील नगर परिषदेच्या वतीने विसर्जनासाठी जमा केलेल्या गणेशमूर्ती कचरा डेपोच्या खड्ड्यात विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी बुधवारी (दि. ३) बारामतीत कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, विरोधी नगरसेवक, भाजपा पदाधिकारी व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिका इमारतीत ठिय्या आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली.

याबाबत आंदोलकांनी प्रांताधिकारी हेमंत निकम, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनामध्ये नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश कडूसकर, आरोग्य निरीक्षक सुभाष नारखेडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी व एन्व्हायर्न्मेंटल फोरम आॅफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी आंदोलकांनी निवेदनात केली आहे. तसेच बारामती नगरपालिकेने हजारो मूर्ती जमा करून घेतल्या आहेत. यापैकी पोलिसांकडे ३९८ मूर्ती जमा आहेत. नगरपालिकेकडे असणाºया उर्वरित मूर्ती पोलिसांनी जमा करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच घडलेल्या घटनेची जबाबदारी स्वीकारून नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, फोरमच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांनी गणेशभक्तांची माफी मागावी. या घटनेचा तपास अधिकारी बदलावा, अशा स्वरूपाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांनी गालिंदे यांच्या विहिरीमध्ये गणेशमूर्ती विसर्जन करण्याबाबत ना-हरकतपत्र घेतले असल्याचा दावा केला होता. हे पत्र गालिंदे यांची फसवणूक करून घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या पत्राचा दुरुपयोग करू नये, अशीही मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान, बारामती शहरात बुधवारी उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. शहरातील प्रमुख बाजारपेठेत बंदमुळे शुकशुकाट होता. नागरिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवत बंदमध्ये सहभाग नोंदवला.जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन संबंधित नगरपालिका अधिकारी व कर्मचारी तसेच एन्व्हायर्न्मेंटल फोरम आॅफ इंडिया संस्थेचे पदाधिकारी यांची चौकशी करून तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणे