शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो वाढविणार पुण्याचा लौकिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 02:18 IST

मेट्रोची चर्चा सुरू झाली त्या वेळी मनात अनेक शंका होत्या. आता प्रत्यक्ष काम सुरू होऊन दोन वर्षे झाली;

पुणे : मेट्रोची चर्चा सुरू झाली त्या वेळी मनात अनेक शंका होत्या. आता प्रत्यक्ष काम सुरू होऊन दोन वर्षे झाली; पण मेट्रोमुळे एक वाहतूक वगळता कुठेही पाडापाडी किंवा कोणाचे नुकसान झालेले नाही. वाहतूककोंडी सुटण्यासाठी मेट्रो सुरू होणे फायद्याचेच असून, त्यामुळे पुणे शहराच्या लौकिकात भरच पडणार आहे असे मत पुण्यातील नामवंतांनी व्यक्त केले.दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त महामेट्रो कंपनीच्या वतीने जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे ‘पुण्याची मेट्रो’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह महापालिका आयुक्त सौरव राव, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीएलच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, वृक्षप्रेमी एस. डी. महाजन, आर. एस. नागेशकर, शशिकांत लिमये, आर. एस. नागेशकर, टी. एम. परचुरे, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले वस्तुपाल रांका आदींनी चर्चेत भाग घेतला.बहुसंख्य वक्त्यांनी मेट्रोच्या कामाबद्दल व त्यामुळे पुण्याचे किती नुकसान होणार आहे याबाबत शंका होती असे सांगितले, मात्र मेट्रोचे काम सुरू झाले, त्यातून आपोआप अनेक शंका मिटत गेल्या, संवाद सारख्या कार्यक्रमाला तज्ज्ञ अभियंते उपस्थित असल्यामुळे त्यांना अनेक गोष्टी विचारता आल्या, असे त्यांनी सांगितले. महाजन यांनी वृक्षांचे पुनर्रोपण करण्याच्या महामेट्रोच्या प्रयत्नांचे कौतुक केले. नवे वृक्ष लावताना देशी वृक्षच लावावेत व तसेच लावले जात आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. परचुरे, रांका, राजेभोसले आदींनी मेट्रोने दोन वर्षांत काम बरेच पुढे नेले असे मत व्यक्त केले.वर्धापनदिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी महामेट्रोने काही स्पर्धा घेतल्या होत्या. त्यात नेताजी सुभाषचंद बोस स्कूल व महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. पूर्वा कानडे, प्रचिती काटे, प्रीती पिल्लई या विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. मुख्य प्रकल्प अभियंता रामनाथ सुब्रह्मण्यम यांनी आभार मानले.>लोक प्रतिनिधींना आमंत्रण नव्हतेकार्यक्रमाला लोकप्रतिनिधींना बोलविले नव्हते. महापौरांनाही निमंत्रण नव्हते. मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे सध्या शहरात बºयाच ठिकाणी वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ही नाराजी व्यक्त व्हायला नको म्हणून त्यांना दूर ठेवण्यात आले असल्याचे समजते.दीक्षित यांनी एकूणच सर्व गोष्टींचा आढावा घेत पुण्याची मेट्रो व मेट्रो स्थानके भारतात प्रसिद्ध होतील, अशी खात्री व्यक्त केली. वेगळ्या कल्पना, वेगळी डिझाइन्स यात वापरण्यात आली आहेत.कोणत्याही गोष्टीत कसलीही कमतरता ठेवण्यात आलेली नाही असे त्यांनी सांगितले. विस्तारित मार्गांचे अनेक प्रस्ताव येत आहेत. त्यातील काहींवर काम सुरू आहे. स्वारगेट ते कात्रज या मार्गाचा प्रकल्प अहवाल आता अंतिम टप्प्यात आहे अशी माहिती त्यांनी दिली.