शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

अकरावीच्या प्रवेशासाठी आता होणार विशेष फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 04:02 IST

इयत्ता अकरावी प्रवेशाची चौथी व अंतिम नियमित प्रवेश फेरीची प्रक्रिया बुधवारी पूर्ण होणार आहे. त्यामुळे अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेºया घेण्यात येणार असून त्याचे सविस्तर वेळापत्रक बुधवारी प्रसिद्ध केले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : इयत्ता अकरावी प्रवेशाची चौथी व अंतिम नियमित प्रवेश फेरीची प्रक्रिया बुधवारी पूर्ण होणार आहे. त्यामुळे अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेºया घेण्यात येणार असून त्याचे सविस्तर वेळापत्रक बुधवारी प्रसिद्ध केले जाणार आहे. महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांना या फेºयांमध्ये सहभागी होता येणार नाही.अकरावीच्या चौथ्या प्रवेश फेरीत सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत प्रवेश घेता येणार आहेत. या फेरीत निवड झालेल्या चारहजार विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतलेला नाही.या फेरीनंतर पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये २० हजारांहून अधिक विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून वंचित असतील, असा अंदाज आहे. तसेच महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे चौथी फेरी पूर्ण झाल्यानंतर केवळ प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी घेण्यात येणार आहे. चौथ्या फेरीअखेर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी या फेरीतून बाद होतील. प्रवेशासाठी निवड होऊनही प्रवेश न घेतलेल्या व कोणतेही महाविद्यालय न मिळालेल्या विद्यार्थ्यांना विशेष फेरीसाठी प्रवेश अर्जाचा भाग दोन पुन्हा भरावा लागणार आहे. जे विद्यार्थी नव्याने भाग दोन भरतील, तेच विद्यार्थी या फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. अद्याप प्रवेश अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांनाही या फेरीत सहभागी होता येणार आहे. या फेरीचे सविस्तर वेळापत्रक बुधवारी प्रसिद्ध केले जाणार असल्याचे समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, विशेष फेरीची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. भाग दोनमध्ये बदल करणे, नव्याने अर्ज करणे, अपूर्ण अर्ज पूर्ण भरणे या कामासाठी तीन दिवसांची मुदत दिली जाईल. तसेच नव्याने अर्ज करणाºया विद्यार्थ्यांना मागर्दर्शन केंद्रावर जाऊन अर्ज अप्रुव्ह करून घ्यावा लागणार आहे.विद्यार्थी-पालकांची गर्दीचौथी फेरी बुधवारी पूर्ण होणार असल्याने अद्यापही प्रवेशासाठी निवड न झालेले, तसेच पहिल्या पसंतीक्रमानुसार निवड होऊनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी व पालकांनी मंगळवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात गर्दी केली होती. गुणवत्ता असूनही अद्याप प्रवेश न मिळालेले विद्यार्थी व पालकांनी या वेळी नाराजी व्यक्त केली. या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार की नाही, यापुढे फेºया होणार की नाहीत, असे अनेक प्रश्न पालकांनी उपस्थित केले. समितीकडून प्रवेशाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न केल्याने विद्यार्थीव पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे शंभरहून अधिक विद्यार्थी व पालक या वेळी जमा झाले होते. सहायक शिक्षण संचालिका मीनाक्षी राऊत यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधत पुढील प्रवेश फेरीबाबत माहिती दिली. प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तेनुसार निश्चितपणे प्रवेश मिळेल. अखेरच्या विद्यार्थ्यापर्यंत आॅनलाइन प्रवेश दिला जाईल, असे राऊत यांनी स्पष्ट केले. त्यानंतर विद्यार्थी व पालकांचे काहीसे समाधान झाले.आजपासून अकरावीचे वर्गज्या कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीचे प्रवेश ७५ टक्के झाले आहेत, त्या महाविद्यालयांचे वर्ग बुधवारपासून (दि. ९) सुरू करण्यात यावेत, अशा सूचना शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना दिल्या आहेत. उर्वरित फेºयांमध्ये जे विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेतील त्या विद्यार्थ्यांसाठी रविवार व सुटीच्या दिवशी विशेष वर्ग घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्यात यावा, असेही टेमकर यांनी स्पष्ट केले आहे