पुणे : अकरावीसाठी अद्याप प्रवेश न मिळालेल्या व दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण तसेच एटीकेटी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी २ सप्टेंबरपासून राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी ४ ते ७ सप्टेंबर २०१७ दरम्यान अर्ज भरायचे आहेत. त्यानंतर ८ सप्टेंबर रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या वतीने पुणे व पिंपरी-चिंचवडमधील महाविद्यालयांच्या अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रक्रिया राबविली जात आहे. आतापर्यंत प्रवेशासाठी ४ फेºया, १ विशेष फेरी व प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य अशा एकूण ६ फेºया राबविण्यात आल्या आहेत. शेवटच्या फेरीअखेरसाधारणत: १०० विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून वंचित आहेत.त्याचबरोबर राज्य मंडळाकडून जुलै-आॅगस्ट २०१७मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल मंगळवारी (दि. २९ आॅगस्ट) जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत पुणे जिल्ह्यातून अडीच हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर, शिल्लक असलेल्या जागांची संख्या १५ हजार इतकी आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकेल.
अकरावी प्रवेशाची विशेष फेरी २ सप्टेंबरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 06:27 IST