शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस नसतानाही पेरणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 23:40 IST

पुरंदर तालुका : शेतकऱ्यांवर ओढवणार दुबार पेरणीचे संकट

भुलेश्वर : पुरंदर तालुक्यात पावसाने पूर्णत: हुलकावणी दिली आहे. मात्र जमिनीत पुरेशी ओल नसतानाही रब्बी हंगामातील ज्वारीचे पीक वाया जाऊ नये, म्हणून शेतकºयांनी पेरणी सुरू केली आहे. मात्र, पावसाअभावी पेरणी केलेल्या ज्वारीची उगवण व्यवस्थित होत नसल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पुरंदर तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील पेरणीची कामे सुरू आहेत. यात सर्वाधिक क्षेत्रावर ज्वारीची पेरणी केली जात आहे. कृषी विभागही या हंगामात ठराविक शेतकºयांच्या शेतात ज्वारीची पेरणी करून बी तयार करतात. श्रावण महिना संपला, की ज्वारीच्या पेरणीची लगबग सुरू होते. मात्र यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगाम पूर्णत: वाया गेला. बाजरीच्या पिकाला तालुका मुकला. खरीप हंगाम जरी वाया गेला असला तरी याची भर रब्बी हंगाम भरून काढेल, अशी अपेक्षा होती. मात्र खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही पावसाने हुलकावणी दिली. पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी कोरडीलाच पेरणी करत आहे. मुसळधार पावसाची सर्वच नक्षत्रे कोरडी गेली आहेत. सध्या पाऊस परतीच्या प्रवासाला निघाला आहे. किती प्रमाणात तो होईल, याची शाश्वती देता येत नाही.पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी येते. शेतकरी पैसे भरून पाणी घेतात. गावाजवळील ओढे-नाले भरून घेतात. यामुळे गावाजवळील विहिरी व बोअरवेल यांना पाणी येते. परंतु पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी हे पुण्याचे सांडपाणी आहे. यामुळे ते स्वच्छ नाही. परंतु दुसरा कोणताही पर्याय नसल्याने नाईलाजाने हे पाणी प्यावे लागते. या भागात पिण्याचे पाणी कसेबसे मिळते. या वर्षात एकही जोरदार पाऊस झाला नाही. यामुळे विहिरींची पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. आज-उद्या पाऊस पडेल, या आशेवर शेतकºयाने लागवड केलेल्या शेवंती, झेंडू, कापरी आदी फुलपिकांची वाढ पावसाअभावी खुंटली आहे. कांदापिकांच्या लागवडी सुरू झाल्या असून काही शेतकºयांनी पाऊस पडेल, या आशेवर कोरड्यातच कांदा लागवडी केल्या आहेत. आठवडाभरात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे.पुरंदर तालुक्यात दरवर्षीच पाऊस कमी पडतो. पावसाच्या आशेवर ज्वारीची पेरणी सुरू आहे. यंदा पावसाने चांगलीच ओढ दिली असून आठवडाभरात पाऊस न झाल्यास ज्वारीच्या पिकावर मोठा परिणाम होऊन ज्वारीचे उत्पादन घटणार आहे.- सुरेश जगताप, शेतकरी

टॅग्स :Puneपुणे