शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींकडून सदर्न कमांडच्या जवानांना रक्षाबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 02:51 IST

लोकमत, इरा फाउंडेशनचा उपक्रम : शाळांमध्ये राखीनिर्मिती कार्यशाळा

पुणे : लोकमत आणि इरा फाउंडेशनतर्फे आयोजित रक्षाबंधननिमित्त पुण्यातील काही शाळांमध्ये राखी तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या विशेष उपक्रमांतर्गत लहानग्यांनी आपल्या हातांनी राख्या बनविल्या. या सर्व राख्या शनिवारी (दि. २५) सदर्न कमांड सिग्नल रेजिमेंट येथील जवानांना लोकमत कॅम्पस क्लब, सखी मंच समन्वयिका आणि रोझरी शाळेच्या मुलींनी बांधल्या.

देशात विविध सण व उत्सव साजरे होत असताना सीमेवर लढणारे जवान मात्र या वेळी आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी प्राणांची बाजी लावत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.या कार्यशाळा उपक्रमात अग्रेसन विद्यालय, आनंद निकेतन विद्यालय, इंडियन एज्युकेशन विद्यालय, राठी स्कूल, महेश विद्यालय, विझडम विद्यालय, ज्ञानअंकुर विद्यालय, सुंदराबाई मराठे विद्यालय, आकाश इंग्लिश मीडियम स्कूल या विद्यालयांतील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. जवानांसाठी रक्षाबंधन साजरा करण्यासाठी असलेल्या या विशेष कार्यक्रमावेळी रोजरी ग्रुपचे विनय अºहाना, खत्री बंधू पॉट आयस्क्रीमचे गिरीश खत्री आदी उपस्थित होते.देशाच्या जवानांसाठी लोकमतसोबत काम करायला मिळाले. जवानांना आपले कर्तव्य बजावत असताना रक्षाबंधनासारख्या सणांनाही मुकावे लागते. या उपक्रमामुळे जवानांच्याही आनंदात भर पडली. - सीमा चव्हाण,संचालिका, इरा फाउंडेशन लोकमतसोबत नेहमीच आम्ही विविध उपक्रमांत सहभागी असतो. परंतु या विशेष उपक्रमात सहभागी होताना गर्वाचा अनुभव झाला. जवान देशाच्या सेवेसाठी कायम तत्पर असतात; परंतु त्यांच्यासाठी काम करायला मिळणे ही आमच्यासाठी पर्वणीच होती. - गिरीश खत्री, संचालक, खत्री बंधू पॉट आइस्क्रीम व मस्तानी.रोझरी ग्रुपच्या सामाजिक उपक्रमांचा भाग म्हणून लोकमतसोबत आम्ही हा उपक्रम राबवला. यात विद्यार्थ्यांना देशासाठी सेवा करणाऱ्या जवानांसाठी काहीतरी करू शकलो याचा आनंद वाटला.- विनय अºहाना,संचालक, रोझरी ग्रुप आॅफ एज्युकेशन

टॅग्स :PuneपुणेRaksha Bandhanरक्षाबंधन