गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले, तर सध्याही वाढत्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कडक लॉकडाऊन आहे. या तेरा महिन्यांत जेजुरीच्या खंडोबा देवाच्या चार सोमवती यात्रा रद्द करण्यात आल्या. तसेच वर्षाकाठीच्या इतर सात यात्राही आत्तापर्यंत रद्द झाल्या आहेत. सोमवार दि. १२ रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत अमावस्या असल्याने उगवत्या सूर्यास अमावस्या असल्याने सोमवती उत्सव आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे असणाऱ्या कडक निर्बंधांमुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. मात्र सोमवती यात्रेनिमित्त खंडोबा देवाचे धार्मिक विधी जेजुरी गडावर मोजक्या मानकरी व पुजारी वर्गाच्या उपस्थित होतील. भाविकांनी व नागरिकांनी मंदिरात व कऱ्हा नदीवर येऊ नये असे आवाहन देवसंस्थांचे विश्वस्त संदीप जगताप, तसेच पालखी सोहळा समितीचे राजेंद्र पेशवे यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवती यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:10 IST