शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सोमेश्वर देवस्थानाची श्रावणी यात्रा उद्यापासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 01:17 IST

श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थानाची श्रावणी यात्रा येत्या रविवार (दि. १२)पासून सुरू होत आहे.

सोमेश्वरनगर : श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थानाची श्रावणी यात्रा येत्या रविवार (दि. १२)पासून सुरू होत आहे. भाविकांच्या सुरक्षेसह विविध सुविधा पुरवण्यासाठी देवस्थान सज्ज झाल्याची माहिती देवस्थानाचे अध्यक्ष विनोद भांडवलकर यांनी दिली.श्रावण महिन्यात दर सोमवारी येथे मोठी यात्रा भरते. राज्य शासनाने सोमेश्वर देवस्थानाला ‘ब’ दर्जा दिल्याने आणि कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने या मंदिराचा कायापालट झाला आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिरात १४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सभामंडपाला रंगरंगोटी करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिराला विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.यात्राकाळात भाविकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी होळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक या ठिकाणी उपस्थित राहील. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून अग्निशामक आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी भक्तनिवासात राहण्याची सोय करण्यात आली असून, यात्रेसाठी येणाºया भाविकांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती देवस्थानाचे अध्यक्ष विनोद भांडवलकर यांनी दिली.यात्राकाळात चोख बंदोबस्तासाठी वडगाव पोलिसांनी कंबर कसली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुरक्षेच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. देवस्थानाच्या वतीने भाविकांसाठी दर सोमवारी महाप्रसादाची सोय करण्यात येणार आहे.सोमायाचे करंजे म्हणून राज्यात प्रसिद्ध असणाºया सोमेश्वराच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून भाविक दर वर्षी येथे गर्दी करतात. मंदिर परिसर विविध प्रकारची खेळणी, मिठाई आणि इतर दुकानांनी गजबजून गेला आहे.>मोफतपार्किंगचीसोय...दर वर्षी येणाºया भाविकांकडून वाहन पार्किंगच्या बदल्यात पैसे घेतले जातात. मात्र, बाहेरगावाहून येणाºया भाविकांसाठी देवस्थानाच्या वतीने मोफत पार्किंगची सोय करण्यात आली आहे.