शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

राजगुरुनगरची वाहतूककोंडी सोडविण्यासाठी हवे ठोस धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 02:16 IST

नवीन पूल, रुंदीकरणही पडू लागले तोकडे; समस्या कायम

खेड : राजगुरुनगर शहरांतर्गत वाहतूककोंडी सोडविण्यासाठी ठोस वाहतूक धोरणाची गरज आहे. यावर विविध तोडगे काढूनही ते तोकडे पडत असल्याचे येथील चित्र आहे. नियोजनाअभावी अजूनही राजगुरुनगरचा श्वास वाहतुकीमुळे कोंडत आहे. हुतात्मा राजगुरू पूल वाहतुकीसाठी खुला झाला. पुणे-नाशिक महामार्गाचे जुजबी का होईना रुंदीकरण व मजबुतीकरण झाले. पोलिसांचा मोठा फौजफाटा वाहतूक नियमनासाठी असतो. काही प्रमाणात अतिक्रमणे हटवली. या साऱ्या प्रयत्नांनंतरही राजगुरुनगर आणि वाहतूककोंडी हे समीकरण कायम आहे. नगर परिषद आणि पोलिसांचेही वाहतुकीबाबत ठोस धोरण नसल्याने वाहतूककोंडीची समस्या राजगुरुनगरमध्ये कायम आहे.अवजड वाहनांना ठराविक काळात प्रवेशबंदी, एकेरी वाहतूक, सम-विषम तारखांना पार्किंग, अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांचे पार्किंग, वाहतूक नियंत्रक दिवे अशा उपाययोजनांची गरज असताना त्या होताना दिसत नाहीत. जुजबी मलमपट्ट्या आणि ठोस वाहतूक धोरणाच्या अभावामुळे वाहतूक समस्या कमी होताना दिसत नाही.राजगुरुनगरमधील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी नाशिक रस्ता ते प्रांत कार्यालयादरम्यान ठराविक काळासाठी अवजड वाहने बंद करावीत. एसटी बस नवीन हुतात्मा राजगुरू पुलावरून वळवाव्यात, सम-विषम तारखांची पार्किंग अंमलबजावणी झाल्यास शहरांतर्गत वाहतूककोंडीला काही प्रमाणात आळा बसू शकतो.काय होतेय?राजगुरुनगर शहरांतर्गत वाहतूक समस्याउपाय काय?अवजड वाहनांना ठराविक काळात गावात प्रवेशएसटी, कंपनी बस, मालवाहक वाहने हुतात्मा राजगुरू पुलाकडून वळवावीतसम-विषम तारखांचे पार्किंगनियमांची अंमलबजावणीपुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक नियंत्रक दिवेरस्त्यावरील वाहनांच्यापार्किंगला शिस्तअवजड व मोठ्या वाहनांची नवीन पुलावरून ये-जा करावी. अस्ताव्यस्त पार्किंगला शिस्त लावावी. स्वयंशिस्त प्रत्येकाने पाळावी. असे झाल्यास वाहतुकीचा ताण कमी होऊन सर्वांचा वेळ व इंधन वाचेल आणि गैरसोय टळेल.- अरुण गायकवाड,माजी सदस्य,राजगुरुनगर ग्रामपंचायतवारंवार होणाºया वाहतूककोंडीमुळे पुणे-नाशिक महामार्ग ठप्प होत आहे. त्यामध्ये अनेक वेळा अ‍ॅम्ब्युलन्सही अडकलेल्या असतात. त्यामुळे रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूक