शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

सैनिकांना दररोज शहीद व्हावं लागणं दुर्दैवी - सुशीलकुमार शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 03:58 IST

‘तुम्ही आमचा एक सैनिक मारला तर आम्ही तुमचे अकरा सैनिक मारू,’ असे इशारे पंतप्रधान मोदी यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात सीमेवर दररोज दोन-चार सैनिक शहीद होत असताना, केंद्रातील सरकार काहीच करताना दिसून येत नाही.

पुणे - ‘तुम्ही आमचा एक सैनिक मारला तर आम्ही तुमचे अकरा सैनिक मारू,’ असे इशारे पंतप्रधान मोदी यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात सीमेवर दररोज दोन-चार सैनिक शहीद होत असताना, केंद्रातील सरकार काहीच करताना दिसून येत नाही. सैनिकांना अशा प्रकारे दररोज शहीद व्हावं लागण दुर्दैवी असल्याची टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी केली.महाराष्टÑ राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने ‘सैनिकहो तुमच्यासाठी’ या सन्मान सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार अनिल शिरोळे, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, महाराष्टÑ राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, शहराध्यक्ष किरण जोशी, कार्याध्यक्ष नितीन बिबवे उपस्थित होते. सीमेवर शत्रुंशी लढताना अपंगत्व आलेल्या मीरबहादूर गुरम, आप्पा राव व पांडुरंग यादव या वीर जवानांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन जैन, कुंकुम नरेन, नंदकुमार चोरडिया, मंगेश पारोटे, कालिदास मोरे, ‘लोकमत’चे वरिष्ठ उपसंपादक निनाद देशमुख, पत्रकार ताजेश काळे, संदीप चव्हाण यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘‘केंद्रात काँगे्रसचे सरकार सत्तेवर असताना निर्भया प्रकरण घडले तेव्हा आम्ही न्यायमूर्ती वर्मा यांची समिती नेमून दोन महिन्यांत बलात्काराबाबतचे कायदे कडक केले. सध्या देशात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान सभागृहाचे नेते असूनही संसदेला सामोरे जात नाहीत. काँग्रेसने उपोषण केले म्हणून भाजपानेही उपोषण केले हे अत्यंत चुकीचे आहे.’’पत्रकारांनी सैनिकांना अभिवादन करण्यारिता कार्यक्रम घेतला हीअत्यंत चांगली बाब आहे.जवानांच्या शौर्याचा गौरव झाल्यामुळे त्यापासून इतरांना सैन्यात जाण्यासाठी प्रेरणा मिळेल.पत्रकार नेहमी दुसऱ्यांच्या घरात डोकावून त्यांच्या दु:खांचा शोध घेत असतो, त्यानंतर त्या दु:खांचे आॅपरेशन करून ती दूर करतो. वॉटरगेटपासून पत्रकारितेला शोध पत्रकारितेची मोठी परंपरा असल्याचे शिंदे यांनी या वेळी सांगितले.संजय भोकरे व किरण जोशी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. संदीप चव्हाण यांनी या वेळी सैनिकांवरील कविता सादर केली.सैनिकांच्या संस्थेला २१ हजारांची मदत‘सैनिकहो तुमच्यासाठी’ या सन्मान सोहळ््यामध्ये सीमेवर शत्रुंशी लढताना अपंगत्व आलेल्या मीरबहादूर गुरम, आप्पा राव व पांडुरंग यादव या वीर जवानांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर त्यांच्यासाठी काम करणाºया पॅराबिलॉजी रिहॅबिलिटेशन संस्थेला २१ हजार रुपयांची मदत या वेळी करण्यात आली.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या