शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

समाज संवेदनाहीन झालाय

By admin | Updated: February 21, 2017 03:08 IST

समाज संवेदनाहीन होत असल्याची खंत ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ

पुणे : समाज संवेदनाहीन होत असल्याची खंत ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला दोन वर्षे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन ४२ महिने होऊनही अद्याप तपास लागला नाही. याबाबत संताप व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी महर्षी वि. रा. शिंदे पुलावर जाऊन सोमवारी निषेध आंदोलन केले. मुक्ता दाभोलकर, मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे प्रा. शमशुद्दीन तांबोळी, मुक्तीवादी संघटनेचे शैलेश सावंत, कॉ. शांताताई रानडे, लता भिसे तसेच महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख, सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे, सदस्य दीपक गिरमे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, शहराध्यक्ष माधव गांधी, चित्रलेखा जेम्स, अनीश पटवर्धन उपस्थित होते. मानवतावादी विचारवंतांना संपविण्याची धर्ममार्तंडांची भाषा अधिक धारदार होऊ पाहत आहे. मात्र कार्यकर्ते हा डाव हाणून पाडतील आणि तथाकथित विविध धर्ममार्तंडांवर वचक बसवतील, असे प्रा. शमशुद्दीन तांबोळी यांनी सांगितले. तर सरकारला खुनी आणि सूत्रधार शोधायचेच नाहीत  असे संपलेल्या कालावधीतून स्पष्ट होते. (प्रतिनिधी)हत्येला झाले ४२ महिने पूर्ण४डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला साडेतीन वर्षे, कॉ. गोविंद पानसरेंच्या दोन वर्षे, तर प्रा. डॉ. कलबुर्गी यांच्या खुनाला दोन वर्षे पूर्ण झाली. या विचारवंतांच्या खून प्रकरणामध्ये आणि मडगाव बॉम्बस्फोटात संशयित म्हणून फरार असलेले सारंग अकोलकर, विनय पवार यांना पकडण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आहे. त्यांना त्वरित पकडण्याची मागणी मुक्ता दाभोलकर यांनी केली.