शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
6
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
7
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
8
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
9
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
10
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
11
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
12
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
13
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
14
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
15
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
16
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
17
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
18
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
19
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर

वादकांचे सामाजिक भान कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 3:48 AM

ढोल-ताशा पथक हे केवळ वादनापुरते मर्यादित नाही. आज संपूर्ण महाराष्ट्रातून ५ हजार वादक सैनिकांसाठी रक्तदान करत आहेत. वादनाचा आनंद देण्यासोबतच सामाजिक जबाबदारीदेखील वादक पार पाडत आहेत.

 पुणे : ढोल-ताशा पथक हे केवळ वादनापुरते मर्यादित नाही. आज संपूर्ण महाराष्ट्रातून ५ हजार वादक सैनिकांसाठी रक्तदान करत आहेत. वादनाचा आनंद देण्यासोबतच सामाजिक जबाबदारीदेखील वादक पार पाडत आहेत. वादकांना एकत्र करून सूत्रबद्ध पद्धतीने सामाजिक जबाबदारीची जाणीव ढोल-ताशा महासंघ करून देत आहे. वादकांच्या माध्यमातून सामाजिक कार्याची संघटित चळवळ निर्माण होत असून, यातून भविष्यकाळात अनेक समाजोपयोगी प्रकल्प राबविले जातील, असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.महाराष्ट्रातील गणेशोत्सवात महत्त्वाची भूमिका बजावणाºया ढोल ताशा महासंघ, महाराष्ट्रच्या वतीने राज्यस्तरीय रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.स.प. महाविद्यालयात रक्तदान शिबिराच्या उद््घाटनप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, संजय सातपुते, भारतीय नौदलाचे विकास पोरावत्री, अ‍ॅड. प्रताप परदेशी, नितीन पंडित, इक्बाल दरबार, राजाभाऊ कदम, उदय जगताप, आनंद सराफ, पीयूष शहा, आशुतोष देशपांडे, केतन देशपांडे, प्रकाश राऊत, अतुल बेहेरे, विलास शिगवण, अ‍ॅड. शिरीष थिटे, अमोल उंदरे आदी उपस्थित होते. पराग ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. संजय सातपुते यांनी सूत्रसंचालन केले.पाच हजार रक्ताच्या पिशव्या संकलनाचा संकल्पपुण्यातील १५० ढोल-ताशा पथकांसह वर्धा, नागपूर, ठाणे, सांगली, कोल्हापूर येथील सुमारे ३५ पथके या उपक्रमात सहभागी झाली असून, पाच हजार रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करण्याचा संकल्प वादकांनी केला आहे.शिबिरातील रक्तदात्यांची यादी सैन्य रुग्णालयाला पाठविण्यात येणार असून, सैन्यातील जवानांकरिता गरजेच्या वेळी ही तरुणाई रक्तदान करून देशाप्रति असलेले कर्तव्य पार पाडण्याकरिता तत्पर राहणार आहे.गणेशोत्सवाच्या काळात वादकांनी स्वयंशिस्तीने वाहतूक सुरळीत राहील, यासाठी नियोजन करायला हवे. यासाठी प्रत्येक पथकाने स्वयंसेवक नेमून द्यायला हवेत. महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, पुण्याच्या गणेशोत्सवाचे यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे पुणे शहरातून सुरू झालेला हा उत्सव संपूर्ण जगभरात आपण पोहोचवायला हवा.- गिरीश बापट,पालकमंत्री पुणे जिल्हा