शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून ‘रासप’ तिन्ही कृषी कायद्याचे समर्थन करतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:09 IST

बारामती: नवीन कृषी कायद्यांनंतरही शेती मालाची आधारभूत किंमत, हमीभाव, बाजार समित्यांचे अस्तित्व ‘जैसे थे’ राहाणार असल्याची हमी केंद्र ...

बारामती: नवीन कृषी कायद्यांनंतरही शेती मालाची आधारभूत किंमत, हमीभाव, बाजार समित्यांचे अस्तित्व ‘जैसे थे’ राहाणार असल्याची हमी केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्ष या तीन्ही कृषि कायद्याचे समर्थन करीत आहे. रासप यापुढेही एनडीएचा घटकपक्ष राहील, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणूका रासप स्वबळावर लढणार असल्याची माहिती पक्षप्रमुख महादेव जानकर यांनी दिली.

बारामती शहरात राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख पदाधिकारी विविध प्रभारी व निवडक कार्य कर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे राष्ट्रीय संघटक पंडीतराव घोळवे होते. यावेळी राज्य महासचिव बाळासाहेब दोडतले, प्रभारी माणिकराव दांगडे पाटील, संदीप चोपडे, अ‍ॅड. अमोल सातकर ज्ञानेश्वर सलगर, आण्णासाहेब पाटील, नितीन धायगुडे,अजित पाटील, वैशाली विरकर, सुवर्णा जऱ्हाड पाटील, कविता माने, पोपट क्षीरसागर, उमाजी चव्हाण, शरद बाचकर आदी उपस्थित होते.

जानकर म्हणाले, काँग्रेसप्रणित युपीए सरकारनेही अशा कृषी सुधारणांबाबत आग्रह धरलेला होता. आताही नवीन कायदे लागू झाल्यानंतरही बाजार समित्यांचे आस्तित्व, आधारभूत किंमत, हमीभाव ही धोरणे अबाधित राहाणार आहेत,याबाबत लेखी हमी केंद्र सरकारने दिलेली आहे. याउलट नवीन कायद्यांमुळे शेती क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढून शेतकऱ्यांना अधिकचे चार पैसे मिळण्यात मदतच होणार आहे. मोदी विरोधक काही संघटनांच्या आडून नवीन कृषी विधेयकांबद्दल शेतकऱ्यांमध्ये भ्रम पसरविण्याचे काम करीत आहे.

कार्यकर्त्यांनी पक्षसंघटन मजबूत करण्याकडे लक्ष द्यावे. जनतेच्या प्रश्नांवर किंवा व्यापक हितासाठी गरजेनुसार इतर पक्षाच्या प्रमुखांना, मंत्र्यांना भेटणे गैर नाही. कार्यकर्त्यांनी जनतेच्या स्थानिक प्रश्नांवर जनतेचा आवाज व्हावे. पक्षाच्यावतीने मार्च २०२१ अखेर ५० लाख सक्रीय सभासद नोंदणी केली जाईल. त्यासाठी अ‍ॅपची निर्मिती केली असल्याचे जानकर यांनी सांगितले.

माजी मंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थितीत रासपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.

२५१२२०२०-बारामती-०९