शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून तयार किल्ले विकत घेण्यावर नागरिक देतायेत भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 18:06 IST

दिवाळी निमित्त विविध अाकारांचे तसेच रंगांचे किल्ले बाजारात दाखल झाले अाहेत. नागरिकांची या किल्ल्यांना माेठी मागणी अाहे.

पुणे : दिवाळी म्हंटलं की सर्वत्र किल्ला बनविण्यासाठीची लहानग्यांची धडपड सुरु हाेत असे. अापला किल्ला सुबक कसा करता येईल याकडे प्रत्येकजण बाराकाईने लक्ष देत असे. दिवाळीच्या सुट्ट्या सुरु झाल्या की किल्ला तयार करण्याची लगबग सुरु हाेत असे. सध्याच्या सिमेंटच्या जंगलामध्ये मात्र हे दिवाळीतील दृश्य इतिहासजमा हाेत चालले अाहे. फारश्या माेकळ्या जागा राहिल्या नसल्याने तसेच फ्लॅट सिस्टीमचे पेव फुटल्याने किल्ला बनविण्यासाठी जागाच उरल्या नाहीत. त्यामुळे अाता एक परंपरा म्हणून बाजारातून पीअाेपीचा किल्ला विकत घेण्यावर नागरिक भर देत अाहेत. या किल्ल्यांना सध्या सर्वत्र मागणी वाढलीये. 

    पुण्यातल्या कुंभारवाडा परीसरात विविध रंगांचे तसेच अाकाराचे किल्ले दाखल झाले अाहेत. त्याचबराेबर शिवाजी महाराजांची मुर्ती, मावळे, गवळणी, सैनिक असे अनेक चित्रं सुद्धा विक्रीस ठेवण्यात अाली अाहेत. पूर्वी मातीचे किल्ले घराेघरी तयार केले जात असे. दिवाळीच्या सुट्ट्यांमधे मुलांसाठी ही उत्साहाची अाणि अावडीची गाेष्ट असत. सध्याच्या स्मार्ट फाेनच्या जगात मुले व्हर्च्युअल गेम्स मध्येच अधिक रमत असल्याने किल्ले तयार करण्यासाठीचा उत्साह कुठेतरी कमी हाेत चालला असल्याचे चित्र अाहे. त्यामुळे बाजारात पीअाेपीचे तयार किल्ले दाखल झाले अाहेत. यात 250 रुपयांपासून ते पाच हजार रुपये किंमतीचे किल्ले अाहेत. केशवनगर येथे हे किल्ले तयार केले जात असून पुण्यातील विविध भागात विक्रीसाठी पाठवले जातात. साचाच्या सहाय्याने तयार करण्यात येणाऱ्या या किल्ल्यांना संपूर्ण तयार हाेण्यासाठी साधारण अाठवडा भराचा कालावधी लागताे. या किल्ल्यांबराेबरच केवळ किल्ल्याचा दरवाजा  तसेच किल्ल्याचे बुरुजसुद्धा विक्रीस ठेवण्यात अाले अाहेत. 

    या किल्ल्यांची विक्री करणारे सागर शिंदे म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून तयार किल्ल्यांना मागणी वाढली अाहे. नागरिकांना वेळ नसल्याने तसेच  फ्लॅट सिस्टीममुळे दारासमाेर फारशी जागा  नसल्याने तयार किल्ले घेण्यावर नागरिकांचा भर अाहे. विविध अाकारांचे किल्ले विक्रीस उपलब्ध अाहेत. दिवळीच्या काही दिवसांपूर्वी हे किल्ले तयार केले जातात. या किल्ल्यांबराेबरच शिवाजी महाराजांच्या विविध मुर्ती सुद्धा तयार करण्यात अाल्या अाहेत. 

टॅग्स :DiwaliदिवाळीFortगडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज