शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
3
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
4
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
5
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
6
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
7
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
8
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
9
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
10
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
11
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
12
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
13
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
14
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
15
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
16
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
17
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
18
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
19
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
20
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका

पुण्यात तस्करी करुन आणलेला सर्वात मोठा सोन्याचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 20:18 IST

दुबईहून पुण्यात मोठ्या प्रमाणावर सोने तस्करी करुन आणण्यात येत असल्याची माहिती महसुल गुप्तवार्ता संचालनालयाला मिळाली होती़.

ठळक मुद्दे३ कोटींची १० किलो सोन्याची बिस्किटे : स्वच्छतागृहात ठेवले होते लपवून

पुणे : दुबईहून तस्करी करुन आणलेले ३ कोटी रुपयांचे १० किलो सोन्याची बिस्कीटे सीमा शुल्क विभागाने गुरुवारी विमानतळावर पकडले़. पुणे शहरातील ही सर्वात मोठी कारवाई आहे़. प्रवाशाने विमानतळावर उतरल्यानंतर तेथील स्वच्छतागृहातील कचरा पेटीमध्ये ही ८६ सोन्याची बिस्किटे टाकलेली आढळून आली आहेत़. दुबईहून पुण्यात मोठ्या प्रमाणावर सोने तस्करी करुन आणण्यात येत असल्याची माहिती महसुल गुप्तवार्ता संचालनालयाला मिळाली होती़. त्यांनी विमानतळावरील सीमा शुल्क विभागाला याची कल्पना दिली़. त्यानुसार दुबईहून येणाऱ्या स्पाईसजेट विमानातील सर्व प्रवाशांची कसून तपासणी करण्यात आली़. परंतु, त्यांच्याकडे काहीही संशयास्पद मिळाले नाही़. त्यानंतर अधिकाऱ्यांनी विमानतळावर सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली़.तेव्हा प्रवासी विमानातून पहिल्या मजल्यावर उतरुन तेथून खाली तपासणीसाठी येतात़. त्या पहिल्या मजल्यावर पुरुषांच्या स्वच्छतागृह आहेत़. तेथे तपासणी केली असता तेथील कचरा पेटीत (डस्टबीन)मध्ये मोबाईलच्या चार मोठ्या कव्हरमध्ये ही ८६ सोन्याची बिस्कीटे ठेवण्यात आली असल्याचे दिसून आले़. त्याचबरोबर २ सोन्याची वेढणीही त्यात होती़. या बिस्किटांचे वजन १०़.१७५ किलो असून त्याची किंमत ३ कोटी ९ लाख, ३४ हजार ६७५ रुपये इतकी आहे़. यापूर्वी पुण्यात १ कोटी रुपयांचे ७ किलोपर्यंतचे तस्करी करुन आणलेले सोने सीमा शुक्ल विभागाने पकडले होते़. ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे पुणे सीमा शुल्क आयुक्तालयाचे उपायुक्त भारत नवले यांनी सांगितले़.