शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पीएमपीची सेवा हवी स्मार्ट

By admin | Updated: July 17, 2017 04:22 IST

दिल्लीसारख्या शहरात बस वाहतुकीच्या अतिशय चांगल्या सुविधा पाहायला मिळतात. तेथे शटल लगेच उपलब्ध असतात आणि हव्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : दिल्लीसारख्या शहरात बस वाहतुकीच्या अतिशय चांगल्या सुविधा पाहायला मिळतात. तेथे शटल लगेच उपलब्ध असतात आणि हव्या त्या ठिकाणी वेळेत व सुरक्षित पोहोचवतात, अशा सुविधा पुणे शहरात दिसत नाही. काळाची गरज आणि मागणीप्रमाणे नागरिकांना बसची सुविधा मिळायला हवी. पीएमपीचा दर्जा सुधारायला हवा तसेच जुन्या बसेस बंद व्हायला हव्यात. नियोजित वेळेत, स्वच्छ आणि सुरक्षित बससेवा पुण्यासारख्या स्मार्ट शहरात असायला हवी, असे प्रतिपादन स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी केले. पीएमपी प्रवासी मंचतर्फे स्मार्ट पुणे-स्मार्ट व सुरक्षित पीएमपी हा विषय घेऊन इंद्रधनुष्य सभागृह येथे पीएमपी प्रवासी मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मंचाचे अध्यक्ष जुगल राठी, विवेक वेलणकर, संजय शितोळे, सतीश चितळे, यतीश देवाडिया यावेळी उपस्थित होते. यावेळी पीएमपीकडे सर्वाधिक तक्रारी नोंदविणाऱ्या अनिल घुले, रोहन निघोजकर, निळकंठ मांढरे, यतिश देवाडिगा, जयदीप साठे, वैभव कामथ, माधुरी जाधव, देवधर, दत्तानंद कुलकर्णी, विपुल पाटील यांना मोफत पास देऊन सन्मान करण्यात आला. पीएमपी सक्षम व्हावी, यासाठी पीएमपीच्या समस्या व्यंग्यचित्रांच्या माध्यमातून मांडणारे ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. राजेंद्र जगताप म्हणाले, पीएमपीच्या अ‍ॅप सोबतच बसस्टॉपवर देखील बसबाबत माहिती असायला हवी. देशातील कोणत्याही शहरात बस वापरासाठी एकच युनिव्हर्सल कार्ड असायला हवे, तंत्रज्ञानाच्या वापराने हे शक्य आहे. इलेक्ट्रॉनिक बसदेखील वापरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी प्रथम प्राथमिक स्तरावर बस आणल्या जातील. या बस ८ ते ९ तास चालतात. तसेच एका वेळी ३०० किलोमीटर अंतर जाऊ शकतात. मोहन सीतापुरे म्हणाले, की डीएसके विश्व धायरी येथे जवळपास २५ हजार रहिवासी आहेत. मध्यवस्तीतून तेथे जाणाऱ्या बस बंद करण्यात आल्या आहेत. या बस त्वरित सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मूकबधिर प्रवाशांनीदेखील आपल्या समस्या मांडल्या