शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बिबट्या पकडणार तोच तिने केली ''ही'' कृती आणि वाचवला जीव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 18:52 IST

अक्षदा ओट्यावर असताना मांजरीवर बिबट्याने झडप घातली आणि मांजर पळून गेली. पुढची झडप अक्षदावर असणार हे स्पष्टच होते.

ठळक मुद्देया रणरागिणीचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती जुन्नर तालुक्यातील घटना : अक्षदाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक

राजुरी (ता. जुन्नर): वेळ संध्याकाळची, जुन्नरजवळच्या राजुरी गावात राहणारी अक्षदा हाडवळे ही तरुणी संध्याकाळी सात वाजता घरावजवळच्या ओट्यावर भुईमुगाच्या शेंगा धुवत बसली होती. अचानक बाजूच्या मक्याच्या शेतातून बिबट्याने तिच्या शेजारी बसलेल्या मांजरीवर झडप टाकली. पुढची झडप अक्षदावर असणार हे स्पष्टच होते. पण क्षणाचा विलंबही न लावता जिवाच्या आकांताने ती ओरडली आणि पळत घरात जात तिने दार बंद केलं. अंगावर काटा उभा राहावा अशी ही घटना काल घडली असून जुन्नर परिसरात तिच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले जात आहे. 

         याबाबत माहिती अशी की, राजुरी येथील अंबिकानगर भागात अशोक हाडवळे आणि कुटुंबीय राहतात.त्यांच्या घराच्या आजूबाजूला मक्याचे शेत आहे. शेत परिसरात बिबट्याचा वावरही आहे. पण शनिवारी घडलेल्या घटनेने सर्वांचाच थरकाप उडाला आहे. अक्षदा ओट्यावर असताना मांजरीवर बिबट्याने झडप घातली आणि मांजर पळून गेली. चिडलेला बिबट्या अक्षदावर झेपावणार तेवढयात तिने ओरडतच घराचा दरवाजा लावला. इतका आरडाओरडा का झाला म्हणून तिचे आईवडील धावत आले तेव्हा तिने ही सर्व हकीकत सांगितली. आपल्या मुलीने शिताफीने दरवाजा बंद करून तिचाच नाही तर कुटुंबाचाही जीव वाचवल्याचे त्यांच्या लक्षात आले. आज तिचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी नोंदवली आहे. 

          दरम्यान राजुरी गाव बिबट्याप्रवण क्षेत्र असून पंधरा दिवसांपुर्वीच याच मळयातील मंगेश हाडवळे हया शेतक-याच्या चार शेळयांवर बिबटयाने हल्ला करून ठार केले. याच ठिकाणी दोन दिवसांपुर्वी  बबन कदम घराजवळून बिबट्याच्या वावर बघायला मिळाला होता. वनविभागाचे अधिकारी जे.बी.सानप यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली.या ठिकाणी बिबट्याचे ताजे ठसे आढळले असून रविवारी संध्याकाळपर्यंत पिंजरा लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरleopardबिबट्याforest departmentवनविभाग