शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बासमती निर्यातीची सहा राज्यांनाच परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 04:22 IST

काही वर्षांत जगभरातून भारतातील बासमती तांदळाला मागणी वाढत आहे. यामुळे बासमतीची निर्यात चांगलीच वाढली असून, वर्षभरात तब्बल १८ लाख ४६ हजार टन बासतमी तांदूळ

पुणे : काही वर्षांत जगभरातून भारतातील बासमती तांदळाला मागणी वाढत आहे. यामुळे बासमतीची निर्यात चांगलीच वाढली असून, वर्षभरात तब्बल १८ लाख ४६ हजार टन बासतमी तांदूळ निर्यात करण्यात आला आहे. ही मागणी कायम ठेवण्यासाठी व बासमतीचा दर्जा टिकविण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान संस्थेने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, जम्मू काश्मीर, हरियाना, आणि हिमाचल प्रदेश या सहा राज्यातूनच बासमती तांदूळ निर्यांत करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात तांदळाचा नवीन हंगाम पंधरा दिवसांत सुरु होत आहे.भारतात बहुतेक सर्वच भागात तांदळाचे उत्पादन होते.यामध्ये उत्तर भारतातील राज्ये बासमती तांदूळ उत्पादनामध्ये आघाडीवर आहेत. गेल्या काही वर्षांत भारतातील तांदळाला प्रामुख्याने बासमतीला जगभरातून चांगली मागणी आहे. परंतु बासमती तांदळामध्ये होणारी भेसळ व दर्जा कायम ठेवण्यासाठी व हाबासमती आयात करणा-या देशाकडून तो नाकारण्याचे प्रमाण करण्यासाठी देशातील सहाच राज्यातील बासमती तांदूळ निर्यात करण्याचा निर्णय भारतीय कृषी अनुसंधान संस्थेने घेतला आहे. अन्य राज्यातील तांदूळ हा ‘नॉन बासमती’ म्हणून निर्यात होणार असल्याची माहिती तांदळाचे व्यापारी राजेश शहा यांनी सांगितले.भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या या निर्णयामुळे मुळे मात्र बासमती व नॉन बासमतीचे दर कमी होऊ शकतात, असे ही त्यांनी स्पष्ट केले.भारतातून तांदळाची निर्यात दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु निर्यात वाढत असताना बासमती तांदूळ आयातदार देशांकडून नाकारला जाण्याचे प्रकारही वाढत आहे. यात प्रामुख्याने बासमतीच्या संकरित जाती आणि अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर करून पिकविलेल्या तांदळाचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवरभारतीय कृषी अनुसंधान संस्थेने सरसकट बासमती निर्यात करण्यास बंदी घातली आहे, असेही शहा यांनी सांगितले.