शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाच्या खूनप्रकरणी सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तरुणावर कोयत्याने वार करून त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी न्यायालयाने ६ जणांना जन्मठेप ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : तरुणावर कोयत्याने वार करून त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी न्यायालयाने ६ जणांना जन्मठेप व प्रत्येकी ५ हजार रुपयांची दंडाची शिक्षा ठोठावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा निर्णय दिला.

बापू शिवाजी कांबळे (वय ४६), सूरज नारायण माने (वय २५), विजय सुरेश गुंड (वय २५), दिलीप गजेंद्र सोनवणे (वय ४४), संतोष दामू सुतार (वय ३३, सर्व रा. अप्पर ओटा, इंदिरानगर, बिबवेवाडी) आणि अमित हिरामण धोत्रे (वय २७, रा. पर्वती पायथा, दांडेकर पूल) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

या आरोपींनी दीपक श्रीमंत सकट (वय २४, रा. अप्पर ओटा, बिबवेवाडी) याचा ९ मार्च २०१४ रोजी खून केला होता. संदीप सकट यांनी बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

बापू कांबळे याच्या मुलीचे दीपक याचा मित्र अलोक दळवी याच्याशी प्रेमसंबंध असल्याची माहिती आरोपींना समजली होती. तसेच दीपक हा त्याला फूस लावत होता. कांबळे याला हे समजल्यावर त्याने साथीदारांच्या मदतीने बिबवेवाडीतील महालक्ष्मी मंदिराजवळ ९ मार्च २०१४ रोजी रात्री साउेनऊ वाजता दीपकचा खून केला होता. या गुन्ह्याचा पोलीस निरीक्षक एम़ बी़ खंडाळे यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी १३ साक्षीदार तपासले. फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार व घटनेनंतर आरोपीच्या कपड्यांवर मयताचे रक्ताचे ङाग इत्यादी पुरावा, आरोपींविरुद्ध गुन्हा शाबीत होण्यास पुरेसा आहे, हा युक्तिवाद अ‍ॅड. विलास घोगरे पाटील यांनी केला़ हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. बिववेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संजय पुणेकर यांनी न्यायालयीन कामात मदत केली.