शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कात्रज-कोंढवा रस्त्यावर होणार सहा पदरी उड्डाणपूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 02:05 IST

आमदार योगेश टिळेकर : नवले चौक ते कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक होणार सुरळीत

- अभिजित डुंगरवाल

कात्रज : वाहतूककोंडीमुळे कुप्रसिद्ध झालेल्या व मृत्यूचा सापळा म्हणून ओळख निर्माण झालेला वडगाव येथील पुलापासून ते कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खडीमशीन चौकापर्यंतचा रस्ता आता मोकळा श्वास घेणार आहे, अशी माहिती ‘लोकमत’शी बोलताना आमदार योगेश टिळेकर यांनी दिली.

याविषयी माहिती देताना आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितले की, अनेकांचे प्राण या रस्त्याने आतापर्यंत घेतले आहेत. भागातील लाखो नागरिक या रत्यावरील अतिक्रमणांमुळे व दररोजच्या वाहतूककोंडीमुळे हैराण झालेले आहेत. मी आमदार झाल्यावर, सर्वप्रथम ८ सप्टेंबर २०१५ रोजी कात्रज ते थेऊर फाटा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर करण्यासाठी लेखी पत्र दिले होते. लक्षवेधी उपस्थित केली. शासन दरबारी सर्व अधिकारी यांच्याशी सतत संपर्कात राहिलो. आंदोलनेदेखील केली. त्यामुळे फेब्रुवारी २०१८ मध्ये हा रस्ता शासनाने राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी. डी. म्हणून घोषित केला आहे.

सदर उड्डाणपूल हा पुणे महानगरपालिका व कात्रज प्राणिसंग्रहालय हद्दीतून जात असल्याने पुणे महानगरपालिकेची नाहरकत मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेने व प्राणिसंग्रहालय प्राधिकरण यांनी तातडीने नाहरकत देणे अपेक्षित आहे.त्यापैकी नवले पूल ते कात्रज सहा पदरी कामासाठी २०१८-१९ मध्ये ९६.७७ कोटी कामाची निविदा प्रगतिपथावर असून कात्रज येथील सहा पदरी पुलाच्या कामासाठी १२६.६९ कोटी रुपयांच्या कामांची निविदा शासन दरबारी सादर झाली आहे.कात्रज-कोंढवा रस्ता जेवढा वाहतूककोंडीसाठी प्रसिद्ध आहे, तेवढाच येथील श्रेयवादाच्या लढ्यासाठी देखील कुप्रसिद्ध आहे. हे काम तातडीने होणे आवश्यक आहे. कारण, अनेकांचे संसार या रस्त्याने उद्ध्वस्त केले आहेत. त्यामुळे येथील सर्व नेत्यांनीदेखील या कामासाठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. मात्र, आता एकजूट होऊन श्रेयवाद थोडासा बाजूला ठेवून हा उड्डाणपूल व रस्ता होण्यासाठी सहकार्य करावे, अशी भावना येथील स्थानिक नागरिकांची आहे.