शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

सिंहगड घाट रस्ता : निधी असूनही दुरुस्ती नाही  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 03:26 IST

सिंहगड घाट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दोन वर्षांपूर्वी वनविभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दीड कोटीहून अधिक रक्कम देऊनही रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.

पुणे : सिंहगड घाट रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दोन वर्षांपूर्वी वनविभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दीड कोटीहून अधिक रक्कम देऊनही रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. येत्या आॅक्टोबर महिन्यात कामांची निविदा काढून, त्यानंतरच दुरुस्तीच्या कामास सुरुवात होणार आहे.सिंहगड घाट रस्त्यावर दरड कोसळल्याने अनेक पर्यटक अडकले होते. गडावर जाण्या-येण्याच्या पायथ्यापासून ते गडापर्यंतचा रस्ता सध्या बंद ठेवण्यात आला आहे. सिंहगड रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम वनविभागाकडेच आहे; मात्र रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वनविभागाने १ कोटी ६१ लाख रुपये रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली होती. गेल्या दोन वर्षांत सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीची कामे केली नाही. दरड कोसळण्याची शक्यता असणाºया ठिकाणी जाळ्या लावल्या नाहीत. त्यामुळे गडावरील रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले दिसून येतात, असा दावा वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे म्हणाले की, सिंहगडाच्या देखरेखीचे काम वनविभागाकडे आहे; मात्र रस्ता दुरुस्ती व इतर कामे करणे स्वत: शक्य नसल्याने वनविभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दोन वर्षांपूर्वी १ कोटी ६१ कोटी रुपयांची रक्कम दिली होती. ही रक्कम कोणत्या कामासाठी खर्च केली. याबाबतची माहिती व हिशेब सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेला नाही.सिंहगडाच्या रस्ते व इतर कामासाठी वनविभागाकडून आणखी दोन कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण) कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे म्हणाले की, ९ किलोमीटर घाट रस्त्यापैकी केवळ २०० मीटर दरड प्रवण भागात जाळी बसविण्याचे काम केले जाणार आहे. निविदेस प्रतिसाद मिळाला नव्हता. इतर कामांसाठी गेल्या मार्चमहिन्यात मंजुरी मिळाली आहे. सार्वजिक बांधकाम विभागातर्फे या कामांच्या निविदा आॅक्टोबरमध्ये काढून, त्यानंतर सुमारे ५ कोटी रकमेच्या कामास सुरुवात केली जाईल. दरड काढण्याचे काम वनविभागाकडून सुरू आहे.आयआयटी मुंबईचे प्राध्यापक टी. एन. सिंग व त्यांच्या पथकाने बुधवारी सिंहगडाची पाहणी केली. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार, गडाच्या माथ्याजवळील दरड कोसळण्याची शक्यता असणाºया ठिकाणी जाळ्या बसविण्याचे काम केले जाणार आहे.- धनंजय देशपांडे,कार्यकारी अभियंता