शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
2
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
3
IND VS SA 3rd ODI : कुलदीप यादवसह प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! दक्षिण आफ्रिकेचा संघ २७० धावांत आटोपला
4
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
6
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
7
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
8
Video - "मी नवरदेव आहे, पण स्वतःच्या लग्नालाच..."; इंडिगोमुळे अडकले प्रवासी, मांडली व्यथा
9
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
10
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
11
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
12
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
13
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
14
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
15
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
17
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; कॅन्सरसह 'या' आजारांचा धोका, आताच बदला सवय
18
अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
19
'कल्कि'च्या सीक्वेलमध्ये दीपिका पादुकोणच्या जागी प्रियंका चोप्रा?, 'देसी गर्ल'नेही ठेवली 'ही' अट
20
Video - गेमर नवरा! विधी राहिल्या बाजुला 'तो' फोनमध्ये मग्न: लग्नमंडपात खेळत होता फ्री फायर
Daily Top 2Weekly Top 5

तेल्या भुत्याच्या कावडीने घाट सर

By admin | Updated: April 9, 2017 04:26 IST

महाराष्ट्रातील अनादी सिद्ध व पुराणसिद्ध ऐतिहासिक भगवान शंकरांचे जागृत देवस्थान, दक्षिण भारताचे कैलास म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथे खळद,

खळद : महाराष्ट्रातील अनादी सिद्ध व पुराणसिद्ध ऐतिहासिक भगवान शंकरांचे जागृत देवस्थान, दक्षिण भारताचे कैलास म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथे खळद, खानवडी, एखतपूर, मुजवडी, कुंभारवळण या पंचक्रोशीच्या संत तेल्या भुत्याच्या कावडीने आज मुंगी घाट सर केला. सर्व भाविकांनी चैत्र शुद्ध द्वादशीला ‘हर हर महादेवा’च्या जयघोषात, शिवभक्तीच्या प्रेरणेने बिगरदोराने केवळ मानवी साखळीच्या साह्याने अवघड असा मुंगी घाट सर करीत पायी वारीने आणलेल्या कऱ्हेच्या पवित्र जलाने निवृत्तीमहाराज खळदकर यांच्या हस्ते स्वयंभू ‘श्रीं’ना धार घातली.तेल्या भुत्याची कावड रणखिळा येथे पोहोचली. या वेळी कावडीसोबत पायी वारीत न आलेले पंचक्रोशीतील हजारो भाविकही येथे दाखल झाले. दुपारी तीनच्या दरम्यान ढोलताशा, लेझीम, वाजंत्री यांच्या गजरात, फटाक्याच्या आतषबाजीत भव्य मिरवणुकीने कावडीने मुंगी घाटाच्या दिशेने प्रयाण केले. सायंकाळी पाचपर्यंत कावड मुंगी घाट पायथ्याला आली. तेथे महाआरती करून शंभोच्या नावाचा महागजर झाला व भक्तिमय वातावरण कावडीची अवघड अशी मुंगी घाटाची चढण सुरू झाली. वाजंत्र्यांच्या, डफडीच्या ठेक्यावर बिगरदोराने केवळ मानवी साखळीच्या साह्याने होणारी कावडीची चढण हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. लाखो भाविक डोंगरमाथ्यावर गर्दी करून बसले होते. या वेळी घाटमाथ्यावर साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप, नीरा बाजार समिती माजी सभापती बाळासाहेब कामथे, जि.प. सदस्य दत्ता झुरंगे, दिलीप यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत काळे, सहायक पोलीस निरीक्षक युवराज हांडे, दहिवडी प्रांत दादासो कांबळे, फलटण प्रांत राजेश चव्हाण, शंभूमहाराज भांडारगृह मठ संस्थानाचे मठाधिपती सिद्धलिंग शिवाचार्य महाराज आदी उपस्थित होते. १० एप्रिल रोजी कावड गुप्तलिंगाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघेल व १३ एप्रिलला पंचक्रोशीत खानवडी मुक्कामाला येईल व नंतर खानवडी, कुंभारवळण, मुंजवडी, एखतपूर, खळद अशा पंचक्रोशीच्या यात्रा सुरू होतील.