शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

शहरातील एटीएमचे ‘शटर डाऊन’च

By admin | Updated: November 16, 2016 02:24 IST

येथे निगडी-तळवडे रस्त्याच्या कडेने रुपीनगर परिसरात विविध बँकाची एटीएम सेंटर आहेत. लोकांनी शंभराच्या नोटा काढण्यासाठी एटीएमच्या

तळवडे : येथे निगडी-तळवडे रस्त्याच्या कडेने रुपीनगर परिसरात विविध बँकाची एटीएम सेंटर आहेत. लोकांनी शंभराच्या नोटा काढण्यासाठी एटीएमच्या बाहेर रांगा लावल्या. त्यानंतर अल्पावधीतच एटीएममधील नोटा संपून गेल्या आणि एटीएम बंद पडली. बंद पडलेली एटीएम अद्यापही सुरू झाली नाहीत. त्यामुळे पैशासाठी वणवण भटकण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. काही मोजक्या ठिकाणी एटीएममध्ये नोटा उपलब्ध करण्यात आल्या. परंतु ज्या ठिकाणी एटीएममध्ये पैसे असतील, तेथे रुपये काढण्यासाठी लगेचच लांबलचक रांगा लागतात आणि अल्पावधीत नोटा संपून जात आहेत. तळवडे आणि रुपीनगर परिसरात एचडीएफसी, अ‍ॅक्सिस, बँक आॅफ महाराष्ट्र, देना बँक, इंडिकॅश अशा विविध बँकांची एटीएम आहेत. यापैकी काही बँकांनी थोड्याफार नोटा ठेवून ग्राहकांची सोय करण्याचा प्रयत्न केला. पण बहुतांश बँकांचे प्रतिनिधी इकडे फिरकलेही नाहीत. तसेच सदर बँकांनी एटीएममध्ये नोटा उपलब्ध करून दिल्या नाहीत. एटीएम सुरु होईल आणि रुपये मिळतील या आशेने नागरिक एटीएमला पहारा देत असल्याचे निदर्शनास आले. यात परप्रांतीय नागरिकांची संख्या जास्त आहे. कामधंदा सोडून एटीएम सेंटरच्या बाहेर बसून रुपये मिळतील, या आशेने एटीएम सेंटरवर पाळत ठेवण्याची वेळ आली असल्याचे एका नागरिकाने सांगितले.बँकेत गेल्यावर दोन हजारांची नोट हातात टेकवली जाते. दुकानात गेल्यास पाचशे आणि हजारांच्या जुन्या नोटा स्वीकारत नाहीत, तर दोन हजारांची नोट घेतली, तरीही सुट्या पैशाचा प्रश्न उभा राहतो. एटीएम बंद आहेत. शंभराच्या नोटांचा तुटवडा आहे, तर पाचशेची नवीन नोट अजूनही बाजारात उपलब्ध नाही. खिशात हजार आणि पाचशेच्या नोटा असून त्यांना किंमत नाही. त्यामुळे किरकोळ व्यवहार ठप्प झाले आहेत. स्थानिक रहिवाशांचे उधारीचे व्यवहार व्यवस्थित सुरू आहेत. परप्रांतीय व्यक्तींना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. (वार्ताहर)