शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
3
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
4
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
5
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
6
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
7
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
8
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
9
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
10
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
11
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
12
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
13
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
14
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
15
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
16
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
17
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
18
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
19
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
20
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर

श्रीवर्धन, मालवणला अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मध्य पूर्व अरबी समुद्र ते दक्षिण कोकणपर्यंत असलेले द्रोणीय क्षेत्र आता दक्षिण अरबी समुद्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मध्य पूर्व अरबी समुद्र ते दक्षिण कोकणपर्यंत असलेले द्रोणीय क्षेत्र आता दक्षिण अरबी समुद्र ते दक्षिण कोकणपर्यंत पसरले असल्याने कोकणात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. श्रीवर्धन, मालवण येथे अतिवृष्टी झाली असून पुढील दोन दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचवेळी मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पेरण्यांसाठी अधिक पावसाची अपेक्षा आहे.

गेल्या २४ तासांत श्रीवर्धन २१०, मालवण १९०, सावंतवाडी १७०, वैभववाडी १६०, देवगड, मुरूड, पेडणे १५०, कणकवली १४०, गुहागर, वाल्पोई, वेंगुर्ला १३०, दोडामार्ग, सांगे १२०, मुळदे, राजापूर, रत्नागिरी, रोहा ११०, दाभोलीम, खेड, म्हापसा, मडगाव, मार्मागोवा, म्हसळा, फोंडा १०० मिमी पावसाची नोंद झाली होती. याबरोबरच कोकणात सर्व दूर जोरदार पाऊस झाला आहे.

मध्य महाराष्ट्रात गगनबावडा १७०, आजारा १६०, चांदगड ९०, राधानगरी ८०, गडहिंग्लज ७०, महाबळेश्वर ६० मिमी पाऊस झाला.

मराठवाड्यात जळकोट ५०, कैज ४०, चाकूर, रेणापूर ३० मिमी पाऊस पडला.

विदर्भात वाशिम ५०, दिग्रस, मालेगाव, मंगळूरपीर, मानोरा ४० मिमी पाऊस झाला असून अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे.

घाटमाथ्यावरील कोयना (पोफळी) ७०, अम्बोणे ५०, ताम्हिणी ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात बुधवारी दिवसभरात महाबळेश्वर ४५, कोल्हापूर ४५, सातारा १३, सांगली ६, मुंबई ९९, सांताक्रूझ २४, अलिबाग ३७, रत्नागिरी ५२, पणजी ४७, डहाणू ३, परभणी २ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हवामान विभागाने सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे. या दोन जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, साता-यातील घाट परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात पुढील चार दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता नाही. तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुण्यात हलक्या पावसाची शक्यता

पुणे शहरात आज दिवसभरात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आल्या. मात्र, त्यात जोर नव्हता. पुणे शहरात पुढील चार दिवस आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.