शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला खरेदीसाठी झुंबड

By admin | Updated: June 2, 2017 02:28 IST

कर्जमुक्तीबरोबर शेतीमालाला हमी भाव मिळावा, या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी गुरूवारपासून संप

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : कर्जमुक्तीबरोबर शेतीमालाला हमी भाव मिळावा, या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी गुरूवारपासून संप पुकारला. या संपात शेतकऱ्यांसह कृषी उत्पन्न बाजार समित्यांनीही सहभाग घेतल्याने भाजी,तसेच फळे आणि दूध उपलब्ध होणार नाही,या विवंचनेने नागरिकांनी भाजी खरेदीसाठी मंडईत गर्दी केली. सायंकाळी पावसाच्या सरी कोसळू लागल्या तरी मंडईत भाजी खरेदी करण्यास झुंबड उडाली होती. शेतकरी संपावर गेल्याचे गुरूवारी सकाळीच अनुभवास आले. शेतीला पूरक दुग्धव्यवसाय करणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून दूध शासकीय दूध डेअरीच्या दूध संकलनाला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शासकीय दूध डेअरीच्या दुधाऐवजी अन्य खासगी दूगध व्यवसायिकांनी बाजारपेठेत पाठविलेल्या दुधाच्या पिशव्या ग्राहकांना खरेदीकराव्या लागल्या. दूध ही दैनंदिनदृष्टया अत्यंत महत्वाची बाब असल्याने दुसऱ्या दिवशी दुधाचा तुटवडा भासेल, ही शक्यता लक्षात घेऊन ग्राहकांनी गुरूवारी अधिक दूध पिशव्या घेऊन फ्रिजमध्ये ठेवल्या. शेतकऱ्यांचा संप किती दिवस सुरू राहिल, हे निश्चित नसल्याने अनेकांनी नेहमीपेक्षा अधिक भाजी आणि फळे खरेदी केली. मंडईत भाजीच्या दरात आज विशेष दरवाढ नव्हती. फळे : हातगाडी, टेम्पो विक्रेते गायबसोसायट्यांमध्ये भाजी, फळे विक्री करण्यास येणारे टेम्पो गुरुवारी दिसून आले नाहीत. अधिकची भाजी खरेदी करून ठेवणे त्यांना परवडणारे नसल्याने शेतकरी संपाच्या काळात टेम्पो घेऊन भाजी विक्रीचे काम त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात थांबवले आहे. नेहमीप्रमाणे फेरिवाले, हातगाडीवालेसुद्धा दिसून आले नाहीत. त्यामुळे बहुतांशी लोकांनी मंडईतून भाजी खरेदी केली.