शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे श्री मोरया गोसावी समाधी सोहळा २७ नोव्हेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 17:08 IST

श्री मोरया गोसावी यांचा ४५६ वा समाधी महोत्सव २७ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या दरम्यान होणार आहे. या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे२७ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या दरम्यान होणार ४५६ वा समाधी महोत्सवविविध क्षेत्रातील मान्यवर व कलाकार हे या वर्षीचे मुख्य आकर्षण

चिंचवड : श्री मोरया गोसावी यांचा ४५६ वा समाधी महोत्सव २७ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या दरम्यान होणार आहे. या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर व कलाकार हे या वर्षीचे मुख्य आकर्षण असणार असल्याची माहिती ट्रस्टचे मुख्य विश्वस्थ मंदार देव महाराज यांनी शनिवारी दिली.मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात गायिका राधा मंगेशकर, जितेंद्र अभ्यंकर, आनंद भाटे, तौफिक कुरेशी हे कलाकार या वर्षीच्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहेत. सांगलीमधील संभाजी भिडे गुरुजी यांना करवीर पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य यांच्या हस्ते या वर्षीचा श्री मोरया जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मोरया गोसावी समाधी मंदीर परिसरातील 'देऊळमळा' या पटांगणात या महोत्सवाचे आयोजन होणार आहे. या पत्रकार परिषदेस विश्वस्थ विश्राम देव, आनंद देव, राजेंद्र उमाप, विनोद पवार, नगरसेविका आश्विनी चिंचवडे, नगरसेवक राजेंद्र गावडे, सुरेश भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम, होम हवन, आरोग्य शिबिरे, प्रवचन, भजन व मराठी सुगम संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या दरम्यान सायंकाळी पाच ते सात या वेळेत ह. भ. प. चारुदत्त आफळे यांचे 'दत्त संप्रदाय व गुरु-शिष्य परंपरा यावर प्रवचन होणार आहे.५ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता मोरया गोसावी यांच्या समाधीची महापूजा, नऊ वाजता गणेशयाग, दुपारी आरोग्य शिबिर, सायंकाळी पाच वाजता अपर्णा रामतीर्थकर यांचे 'नाती जपुया' या विषयी व्याख्यान, रात्री साडेआठ वाजता 'मोगरा फुलला' हा संगीत कार्यक्रम सादर होणार आहे.६ डिसेंबरला सकाळी सात वाजता सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, महाभिषेक नऊ वाजता श्री दत्तयाग व साडेनऊला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी अपर्णा रामतीर्थकर यांचे व्याख्यान व रात्री आठ वाजता आनंद भाटे यांचा 'आनंदरंग' हा कार्यक्रम होणार आहे.७ तारखेला सकाळी गोंदवलेकर महाराज आरती मंडळाची काकड आरती होणार आहे. नऊ वाजता महिलांचे सामुदायिक श्री सूक्त पठण व कुंकुमार्जन नऊ वाजता दत्तयाग, नेत्र चिकित्सा शिबिर व माफक दरात चष्मे वाटप, सायंकाळी साडेपाच वाजता संभाजी भिडे गुरुजी यांचे 'भगवान श्री छत्रपती आणि आपण' या विषयावर व्याख्यान नंतर जीवन गौरव पुरस्कार साडेआठ वाजता तौफिक कुरेशी यांचे जंबे वादन व तन्मय देवचक्के यांचे हार्मोनियम वादन होणार आहे.८ तारखेला मोरया गोसावी यांच्या समाधी दिवशी पहाटे साडेचार वाजता मंदार देव महाराज व चिंचवड ब्राम्हवृंद यांच्या हस्ते समाधीची महापूजा व अभिषेक व नंतर भव्य दिंडी व समाधी मंदीरावर पुष्पवृष्टी करण्यात येईल. साडेदहा वाजता हभप प्रकाश महाराज बोधले यांचे काल्याचे कीर्तन व १२ वाजल्यापासून भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुख्य कार्यक्रम * सोमवार (२७ नोव्हेंबर) ते शुक्रवार (८ डिसेंबर) सकाळी आठ ते नऊ सतीश कुलकर्णी हे श्री मोरया गोसावी चरित्र पठण करणार आहेत* २७ ते ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते१२ व सायंकाळी ५ ते ७ गुरुचरित्र पठण* संपूर्ण महोत्सव दरम्यान १ ते ४ या वेळेत विविध भजनी मंडळांचे भजन सादरीकरण होणार आहे.* २८ व २९ नोव्हेंबर रोजी रात्री ८ ते ९ हभप नारायण श्रीपाद काणे यांचे कीर्तन होणार आहे.* ३० नोंव्हेंबर रात्री ८ ते ९ तानसेन संगीत विद्यालय सुगम संगीत सादरीकरण* १ डिसेंबर रात्री ८ ला डॉ. जयंत करंदीकर यांचे गुरुमहात्म्य या विषयी प्रवचन* २ व ३ डिसेंबर रात्री ८ ला प्रणव देव यांचे श्री मोरया गोसावी या विषयावर कीर्तन* ४ डिसेंबर पहाटे साडेसहा वाजता उचगावकर सर यांचे योगासन वर्ग, विनोद व जयश्री कुलकर्णी हे 'आठवणीतील गाणी' सादर करतील. रात्री सात वाजता जागृती कला मंच 'उगवला चंद्र पुनवेला' हा नृत्याचा कार्यक्रम सादर करतील.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड