शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

माऊलींच्या संजीवन समाधीवर साकारला श्रींचा विठ्ठल अवतार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 20:01 IST

मंदिरात माऊलींच्या संजीवन समाधीवर आकर्षक वस्त्रालंकार, पूजासाहित्य, पुष्प सजावट करीत श्री विठ्ठल अवतारातील वैभवी रूप साकारले. श्रींचे मंदिरातील रूप पाहण्यास व श्रींचे दर्शनास भाविकांनी गर्दी केली. 

ठळक मुद्देचंदन उटी, माऊली मंदिरात गौरीपूजनासह दर्शनास भाविकांची गर्दीमाऊलींच्या संजीवन समाधीवर चंदन उटीसह विविध वस्त्रालंकार वापरून श्रींचे विठ्ठल अवतार आकर्षक

आळंदी : श्री ज्ञानेश्वरमहाराज संजीवन समाधी मंदिरात प्रथा-परंपरांचे पालन करीत चैत्र महिन्यातील अक्षय तृतीयेनिमित्त श्रींना चंदन उटी लावण्यात आली. श्रींचे संजीवन समाधीवर चंदन उटीसह विविध वस्त्रालंकार वापरून श्रींचे विठ्ठल अवतार आकर्षक वैभवी रूप परिश्रमपूर्वक अभिजित धोंडफळे आणि देवस्थानचे सेवक पुजारी यांनी साकारले. आळंदी देवस्थान व स्वकाम सेवा मंडळाने अक्षय तृतीयेनिमित्त चंदन उटीसह मंदिरात चैत्रगौरीपूजन उत्साहात केले. याप्रसंगी महिला भाविकांनी कारंजा मंडपात गर्दी करून दर्शन आणि हळदी-कुंकू घेतले. आळंदी मंदिरातील कारंजा मंडपात चैत्र गौरीपूजनानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली होती. चैत्र गौरीचे वैभवी रूप पाहण्यासह श्रींचे दर्शनास महिला, भाविक नागरिकांनी मंदिरात गर्दी केली. माऊली मंदिरातील प्रथा-परंपरांचे पालन करीत अक्षय तृतीयेनिमित्त प्रथम घंटानाद, काकडा, श्रींना पवमान अभिषेक, दुधारती, भाविकांच्या पूजा आणि भाविकांचे दर्शन, तसेच महिलांचा हळदी-कुंकू असे कार्यक्रम झाल्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले. याप्रसंगी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक, मालक बाळासाहेब आरफळकर, स्वकाम सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील तापकीर, स्वकामसेवक आदी उपस्थित होते. व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, संजय रणदिवे, श्रीधर सरनाईक, सोमनाथ लवंगे, संजय लवांडे, महेश गोखले आदींनी संस्थानच्या प्रथेप्रमाणे मंदिरातील धार्मिक महत्त्व ओळखून भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था ठेवली. वीणामंडपात वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने प्रवचनसेवा झाली. श्रींच्या मंदिरात अक्षय तृतीयेनिमित्त असणारी नित्य नैमित्तिक परिश्रमपूर्वक चंदन उटीचा वापर करून साकारण्यात आली. गांधी परिवारातर्फे येथील नृसिंहसरस्वती स्वामी महाराज मठातदेखील चंदन उटीची परंपरा कायम आहे. गांधी येथील श्रीक्षेत्रोपाध्ये पुजारी आहेत. स्वामी महाराज मठात गांधी परिवाराने चंदन उटी साकारली. मंदिरात माऊलींच्या संजीवन समाधीवर आकर्षक वस्त्रालंकार, पूजासाहित्य, पुष्प सजावट करीत श्री विठ्ठल अवतारातील वैभवी रूप साकारले. श्रींचे मंदिरातील रूप पाहण्यास व श्रींचे दर्शनास भाविकांनी गर्दी केली.  

टॅग्स :Alandiआळंदी