शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पणत्यांनी उजळले श्रीकाळभैरवनाथ मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 23:50 IST

खोर : खोर (ता. दौंड) परिसरामध्ये दीपावली पाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीदेखील पारंपरिक प्रथेप्रमाणे खोरचे श्री ...

खोर : खोर (ता. दौंड) परिसरामध्ये दीपावली पाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीदेखील पारंपरिक प्रथेप्रमाणे खोरचे श्री काळभैरवनाथ मंदिर, हनुमान मंदिर व लक्ष्मीमाता मंदिर परिसर दीपावली पाडव्याच्या सणाला हजारो पणत्यांनी उजळून निघाला होता.

मंदिरासमोरील अंगणात तब्बल ८ तास आकर्षक रांगोळी काढण्यात आली. ही रांगोळी प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होती. गावातील प्रत्येक व्यक्ती, वाटसरू या भव्यदिव्य काढलेल्या रांगोळीसोबत आपला सेल्फी काढत होता. मंदिरामध्ये लावलेल्या हजारो पणत्यांच्या लखलखत्या प्रकाशझोताने मंदिर परिसर व रांगोळीने उपस्थितांचे मन आकर्षित होऊन अगदी प्रसन्न होऊन जातहोते. कार्यक्रमाचे आयोजन खोर मित्र ग्रुपच्यावतीने करण्यात आले होते.याप्रसंगी खोरचे सरपंच सुभाष चौधरी, विजय कुदळे, राजेंद्र डोंबे, राजेंद्र चौधरी, जालिंदर डोंबे, भाऊ डोंबे, भानुदास डोंबे, गणेश साळुंखे, साहेबराव डोंबे, योगेश शिंदे, चेतन गायकवाड, प्रमोद शिंदे, दादाशिंदे, गणेश फरतडे, सुरेश शेंडगे, दिनकर डोंबे, सुनील डोंबे, तसेच मोठ्या संख्येने महिलावर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.पेडगावच्या किल्ल्यात दीपोत्सवदेऊळगावराजे : पेडगाव (ता. दौंड) येथील युवकांनी पेडगावच्या किल्ल्यात भव्य दीपोत्सव साजरा केला.दिवाळी पाडव्यानिमित्त दरवर्षी भव्य दीपोत्सव साजरा करण्यात येतो. छत्रपती श्री संभाजीमहाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पेडगाव किल्ल्यात ३५०० दिवे लावून भव्य दीपोत्सव साजरा केला. फटाक्यांची भव्य गगनचुंबी आतषबाजी करण्यात आली. संभाजीमहाराज स्मारक, लक्ष्मीनारायण मंदिर, बालेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, रामेश्वर मंदिर, भैरवनाथ (विष्णू) मंदिर, पाताळेश्वर मंदिर व टेकडीवरील पायऱ्यांवर पणत्या लावून परिसर प्रकाशमय केला.आदिवासी गरीब बांधवांना व गडपालांना दिवाळी फराळाचे व मिठाईचे वाटप करण्यात आले. उपक्रम श्री शिवदुर्ग संवर्धन समिती सदस्य प्रा. राजेश बाराते, नीलेश खेडकर, देवेंद्र अवचर व प्रल्हाद जाधव, तसेच गडपाल नंदू क्षीरसागर, भाऊ घोडके व मच्छींद्र पंडित यांनी पार पाडला. पेडगाव, वडगाव दरेकर येथील शिवप्रेमी उपस्थित होते. 

टॅग्स :PuneपुणेDiwaliदिवाळी