शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

रेस्क्यू फाउंडेशनला कारणे दाखवा नोटीस, न्यायालयाचा आदेश, निर्णयाची अंमलबजावणी न केल्याने कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:01 IST

मुलीचा ताबा तिच्या भावजयीला देण्याचा आदेश देऊनही, त्याची अंमलबजावणी न करणा-या रेस्क्यू फाउंडेशनच्या अधीक्षकांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. मेश्राम यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

पुणे : मुलीचा ताबा तिच्या भावजयीला देण्याचा आदेश देऊनही, त्याची अंमलबजावणी न करणा-या रेस्क्यू फाउंडेशनच्या अधीक्षकांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. मेश्राम यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.रेस्क्यू फाऊंडेशन हडपसर येथे असलेल्या मुलीचा ताबा मिळावा, यासाठी सलमा राजू ऊर्फ सिराजउद्दीन शेख ऊर्फ सय्यद हिने न्यायालयात याचिका दाखल केली होती. फरासखाना पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यात पीडित मुलीचा ताबा मिळावा, अशी मागणी त्यांनी रेस्क्यू फाऊंडेशनकडे केली होती. मात्र अर्जदाराला ताबा देण्यात आला नव्हता. त्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्यामार्फत तिचा ताबा मिळावा, अशी मागणी केली होती. न्यायालयाने या प्रकरणात तिचा ताबा देण्याचा आदेश दिला होता. याप्रकरणी न्यायालयाने रेस्क्यू फाऊंडेशनच्या अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन का करण्यात आले नाही, याचा खुलासा करावा आणि संबंधित पीडित मुलीचा ताबा अर्जदार महिलेला द्यावा, असे त्यात म्हटले आहे. अर्जदारातर्फे अ‍ॅड. सुचित मुंदडा, अ‍ॅड. दादासाहेब लोंढे यांनी काम पाहिले....आम्ही सोडणार नाहीन्यायालयाच्या आदेशानंतर अर्जदार महिला तेथे गेली असता, संस्थेच्या कर्मचाºयाने आज संस्थेची वेळ झालेली आहे. याआधीच्या मुलींच्या आदेशाची प्रक्रिया सुरू असल्याने आम्हाला आज सोडता येणार नाही, असे सांगितले. त्यानंतर कर्मचाºयांनी तिला २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बोलावले. त्या दिवशी देखील आता मॅडम महत्त्वाच्या बैठकीसाठी बाहेर गेल्या असल्याचे सांगितले.न्यायालयाचा आदेश असो अथवा नसो आम्ही तिला सोडणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा ती कशी सुटते ते बघतो, अशी धमकी तिला दिली. तसेच अर्जदाराला पीडित मुलीला भेटूही देण्यात आले नाही, असे न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात म्हटले आहे.