शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

थोडक्यात हुकलेली संधी अखेर गवसली

By admin | Updated: June 2, 2017 02:30 IST

यूपीएससी परीक्षेमध्ये गेल्या वर्षी मुलाखतीपर्यंत धडक मारली; मात्र अवघ्या काही गुणांनी आशिष पाटील यांची आयएएस अधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : यूपीएससी परीक्षेमध्ये गेल्या वर्षी मुलाखतीपर्यंत धडक मारली; मात्र अवघ्या काही गुणांनी आशिष पाटील यांची आयएएस अधिकारी बनण्याची संधी हुकली होती. त्यानंतर इंडियन बँकेच्या आॅफिसर पदासाठी निवड झाली; मात्र पुन्हा यूपीएससी परीक्षेची तयारी करायची की बँकेत नोकरी स्वीकारायची याबाबत द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती. अखेर पुन्हा यूपीएससी परीक्षेला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला अन् गेल्या वर्षी अवघ्या काही गुणांनी हुकलेली संधी पाटील यांना गवसली.यूपीएससी परीक्षेत आशिष पाटील याला ३३०वी रँक मिळाली आहे. आशिष मूळचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील आहेत. त्यांच्या वडिलांचा वेल्डिंगचा वर्कशॉप आहे, तर आई गृहिणी आहे. बारावीनंतर आशिषने पुण्यातून इलेक्ट्रॉनिक अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग केले. गेल्या ३ वर्षांपासून तो यूपीएससीची तयारी करीत होता. यूपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात त्याला यश आले नव्हते. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात थेट मुलाखत दिली होती; मात्र अवघ्या काही गुणांनी त्याचे आयएएस व्हायचे स्वप्न भंगले होते. नाशिक येथील प्री-आयएएस सेंटरमध्ये त्याने एक वर्ष यूपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यानंतर पुण्याजवळील नऱ्हे गाव येथे रूम घेऊन पूर्णवेळ स्वयंअध्ययन करण्यावर भर दिला. अखेर २०१६-१७ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत त्याने यशाला गवसणी घातली.यशामध्ये आईचा वाटा मोठाआशिष यांच्या आईचे शिक्षण एम.ए.बी.एड.पर्यंत झाले आहे; मात्र त्यांनी नोकरी न करता पूर्णवेळ घराकडे लक्ष दिले. लहानपणापासून आशिषच्या अभ्यासाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. या यशामध्ये आईचा मोठा वाटा असल्याचे आशिषने सांगितले.