शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आंबेगाव येथे तोल जाऊन विहिरीत पडल्याने तरुणाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 20:50 IST

हा तरुण अंघोळीसाठी विहिरीवर गेला होता. त्याला पोहता येत नव्हते.

मंचर: गावडेवाडी (ता आंबेगाव) येथील माथावस्ती परिसरात विहिरीत तोल गेल्याने एक जण बुडाला असून त्याचा शोध रात्री उशिरापर्यंत लागला नव्हता. कृष्णा सखाराम शेळके (वय १८, मूळ रा. परभणी) असे विहिरीत पडलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ ला पाचारण करण्यात आले आहे.मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील माथावस्ती परिसरात कृष्णा हा शुक्रवारी सकाळी साडेबाराच्या सुमारास विहिरीत तोल जाऊन पडला आहे. हा तरुण अंघोळीसाठी विहिरीवर गेला होता. त्याला पोहता येत नव्हते. त्यामुळे तो बाहेरच आंघोळ करत होता. मात्र तोल जाऊन तो विहिरीत पडला. त्याच्या समवेत एक लहान मुलगी होती. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. हा आवाज ऐकून संबंधित मुलाचे वडील मदतीसाठी धावून आले. वडिलांनाही नीट पोहता येत नव्हते. मात्र मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी धाडसाने विहिरीत उडी घेतली. दुर्देवाने त्यांना मुलाला वाचवता आले नाही. मोटारीच्या पट्ट्याला धरून वडिलांनी तग धरला. मात्र कृष्णा हा तरुण विहिरीच्या पाण्यात बुडाला.  विहिरीत पन्नास फूट खोल पाणी असल्याने त्याला शोधण्यासाठी अडचण येत होती. पोहणाऱ्याच्या मदतीने शोध घेण्यात आला. मात्र त्यात यश आले नाही. शेवटी मंचर पोलिसांनी विहिरीच्या पाण्यात कॅमेरा 50 फूट खोल पाण्यात टाकून संबंधित तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो तरुण पाण्यात अडकला असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंचर पोलिसांनी एनडीआरएफला पाचारण केलेले आहे.अद्यापपर्यंत ही टीम या ठिकाणी आली नसून या परिसरातील नागरिक एनडीआरएफची वाट पाहत आहे. शुक्रवारी तालुक्यात तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :ambegaonआंबेगावDeathमृत्यूdrowningपाण्यात बुडणे