शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ... ! आईलाच वेडे ठरविण्याचा प्रयत्न..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 21:44 IST

एमएससीबीमधून वरिष्ठ पदावरुन निवृत्त झालेल्या एका ज्येष्ठ महिलेची ही चित्तरकथा. एकुलता एक मुलगा, सून, नातवंडे असे भरलेले घर. पण वयानुसार त्यांच्यात काहीसा विक्षिप्तपणा आला़... 

ठळक मुद्देत्यांना हवे होते फक्त भरल्या कुटुंबाचे प्रेम : ज्येष्ठ नागरिक कक्षाने घडवून आणला समझोतामाझ्यानंतर सर्व त्याचेच आहे़ मला काही नको, फक्त प्रेम हवे, अशा शब्दातून आईच्या विशाल ह्दयाची प्रचिती

विवेक भुसे

पुणे :  आज ७२ त्या वर्षांच्या आहेत़. अजूनही स्वत: सफाईदारपणे मोटार चालवितात़. त्या काळात मोटारसायकल चालविणाऱ्या शहरातील पहिल्या ४ -५ जणींमध्ये त्यांचा क्रमांक होता़. आजही तितक्याच कणखर आहेत़. पण वयानुसार त्यांच्यात काहीसा विक्षिप्तपणा आला़. त्याला वेडेपणा समजून एकुलत्या एक मुलाने त्यांची रवानगी मांजरी येथील पुनर्वसन केंद्रात केली़. तेथून त्या बाहेर आल्यानंतर त्यांनी ज्येष्ठ नागरिक कक्षाची मदत घेतली़. पोलिसांनी मुलाला ‘आपल्या भाषेत’ समजावून सांगितल्यानंतर मुलगा त्यांचा सांभाळ करण्यास तयार झाला़. तेव्हा त्यांनी माझ्यानंतर सर्व त्याचेच आहे़ मला काही नको, फक्त प्रेम हवे, अशा शब्दातून आईच्या विशाल ह्दयाची प्रचिती दिली़.  एमएससीबीमधून वरिष्ठ पदावरुन निवृत्त झालेल्या एका ज्येष्ठ महिलेची ही चित्तरकथा. एकुलता एक मुलगा सून, नातवंडे असे भरलेले घर. मुलाचा केटरिंगचा व्यवसाय करतो़. वयानुसार आईच्या स्वभावात थोडा विक्षिप्तपणा आला़ पण, मुलाने  त्याचा वेगळाच अर्थ काढला़. त्यांना मांजरी येथील पूनर्वसन केंद्रात दाखल केले़ मानसिक रुग्ण समजून त्यांच्यावर उपचार केले गेले़. जवळपास दोन महिने त्या तेथे होत्या़. त्यांच्या भावाला माहिती मिळाल्यानंतर त्यांचा मुलाबरोबर वाद झाला़. त्यांना तेथून घरी आणण्यात आले़. त्यानंतर त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयातील ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे धाव घेतली़ पोलीस आयुक्तालयात त्या स्वत: मोटार घेऊन आल्या होत्या़. पोलीस निरीक्षक स्वाती थोरात व त्यांच्या सहकारी जयश्री जाधव, गजानन सोनाळकर व इतरांनी त्यांचे समुपदेशन केले़ पण मुलगा काही तयार होईना़, तेव्हा पोलिसांनी त्यांनी त्याला आपल्या भाषेत त्याचा परिणामाची जाणीव करुन दिली़. तेव्हा त्याने आईचा सांभाळ करण्याचे मान्य केले़. मुलाने वेळोवेळी आईच्या खात्यातून पैसे काढले होते़ ते ९८ हजार रुपयेही परत केले़. त्यानंतर पोलिसांनी त्यांना विचारले आजी आणखी काय हवे?, तेव्हा त्या म्हणाल्या, मला आता काही नको, प्रॉपर्टी तर त्याचीच आहे़ त्याने मला कोठेही अशाप्रकारे दाखल करुन नये़ मला केवळ त्यांचे प्रेम हवे आहे़. याबाबत स्वाती थोरात यांनी सांगितले की, वयोमानानुसार ज्येष्ठांमधील विक्षिप्तपणा वाढतो़. पण ते काही मानसिक रुग्ण नसतात आणि मुलांनीही तसे समजू नये़. या वयात त्यांना समजावून घेण्याचा प्रयत्न सर्वांनी करण्याची गरज आहे़. अनेकदा सासूचा सूनेवर राग असतो़. सूनेमुळेच मुलगा आपल्याशी असे वागतो, असे त्यांना वाटते़. पण, इथे त्यांनी सून चांगली असल्याचे सांगितले़. हे तसेच त्यांचे वागणे, बोलण्यावरून त्या मानसिक रुग्ण नसल्याचे जाणविले़. पण ज्येष्ठांचे एकाकी वागणे मुले समजून घेत नाही़. 

टॅग्स :PuneपुणेWomenमहिला