शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! रुग्ण वाढल्याने ऑक्सिजन बेड मिळणे झाले कठीण, खुर्चीवर बसून ऑक्सिजन घेण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 13:04 IST

वायसीएम रुग्णालयावरचा ताण वाढला

ठळक मुद्देरुग्णालयात सध्या फक्त गंभीर रुग्णांच्या शस्त्रक्रिया सुरू

तेजस टवलारकर

पिंपरी: शहरातील कोरोना रुग्णाची संख्या वाढल्याने वायसीएम रुग्णालयावरचा ताण वाढला आहे. ज्या रुग्णांना गंभीर लक्षणे आहेत. ज्यांची  ऑक्सिजन पातळी ही ९० पेक्षा कमी आहे. अशा रुग्णांना येथे दाखल केले जात आहे. परंतु रुग्ण वाढल्याने येथे ऑक्सिजन बेड मिळणे कठीण झाले आहे. अनेक रुग्णांना  ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. तसेच रुग्णांच्या रांगा लागत असल्याची स्थिती आहे. तर काही रुग्ण अक्षरशः खुर्चीवर बसून ऑक्सिजन घेत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

सद्यस्थितीत वायसीएम रुग्णालयातील पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर कोरोनाचे रुग्ण आहेत. तिसरा मजल्यावरील दोन वार्ड मध्ये ही कोरोनाचे रुग आहेत, तर दोन वॉर्ड हे कोरोनाच्या संशयित रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. पहिल्या मजल्यावरील एक आयसीयू कोरोना रुग्णांसाठी तर एक आयसीयू इतर रुग्णांसाठी ठेवण्यात आला आहे. फक्त चौथा मजला हा इतर रुग्णांसाठी राखीव ठेण्यात आला आहे.  त्याच बरोबरच रुग्णालयात असलेल्या रुबी अल केअरचे आयसीयू येत्या एक ते दोन दिवसात ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णालय कोविड रुग्णालय झाल्याची स्थिती आहे.

रुग्णालयांमध्ये कोरोना आणि इतर आजारांच्या रुग्णाची ये-जा असते. त्यामुळे नेमका कोणता रुग्ण कोरोनाचा आहे, हे लक्षात येत नाही. यामुळे येथील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक रुग्ण कोरोनाचे असल्याने त्याचा परिणाम हा बाह्य रुग्णालयातील ओपीडिवर झाला आहे.  रोज होणारी ओपीडी कमी झाली आहे. रुग्ण संख्या कमी असताना रोज साधारण १५०० रुग्णांची ओपीडी होत होती. सद्यस्थितीत रोज ५०० रुग्णांची ओपीडी होत आहे. 

चतुर्थ श्रेणी  कर्मचाऱ्यांची कमतरता कोरोना रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी जी प्रक्रिया करावी लागते. त्यासाठी  सध्या फक्त सात कर्मचारी आहेत. प्रत्यक्षात या ठिकाणी १५ ते २० कर्मचाऱ्यांची गरज आहे. रुग्णाला दाखल करताना या कर्मचाऱ्यांना रुग्णासोबत जावे लागते.  ज्या वॉर्ड मध्ये रुग्णाला दाखल केले तिथे ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन जावे लागते. तसेच रुग्णालयात जागा नसल्यास इतर ठिकाणी रुग्णाला पाठविले तर तिथेही या कर्मचाऱ्यांना जावे लागते. रुग्णाला दाखल करून घेण्याची पूर्ण प्रक्रिया यांना करावी लागते. त्यामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचारी वाढविण्यात येणे गरजेचे झाले आहे. रुग्णालयात एकूण ५०० परिचारिका आणि वार्ड बॉयची गरज आहे. प्रत्यक्षात ३४५ कर्मचारी उपलब्ध आहेत. तर मदतनीस आणि इतर कामासाठी ३१५ कर्मचाऱ्यांची गरज असून सध्या २५५ कर्मचारी आहेत. 

रुग्णांची पसंती वायसीएमलाच सुरुवातीपासून वायसीएमचा मृत्यू दर हा कमी आहे. सुविधा उपलब्ध आहेत. महापालिकेच्या इतर रुग्णांलय आणि जम्बो च्या तुलनेत रुग्ण वायसीएममध्ये दाखल होण्यासाठी रुग्ण आग्रह धरत असल्याची स्थिती आहे. 

अत्यावश्यक शस्त्रक्रिया सुरू रुग्णालयात सध्या फक्त अत्यावश्यक आणि गंभीर रुग्णांच्या शस्त्रक्रिया सुरू आहे. इतर शस्त्रक्रिया बंद आहेत.

 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस