शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पुण्यात चार कुत्र्यांना जिवंत जाळले, 16 कुत्र्यांवर केला विषप्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 13:19 IST

भटक्या कुत्र्यांच्या त्रासातून सुटका करुन घेण्यासाठी काहीजण  टोकाचा मार्ग अवलंबतात. अशीच एक भीषण घटना पुण्यात समोर आली आहे.

ठळक मुद्देएएसीटी इंडिया या एनजीओच्या सदस्यांना तपासामध्ये कुत्र्यांच्या जळालेल्या मृतदेहाचे अवशेष तसेच कुजलेल्या अवस्थेतील कुत्र्यांचे  मृतदेह सापडले. एएसीटी इंडियाच्या सदस्यांनी पुणे पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पुणे - भटक्या कुत्र्यांच्या त्रासातून सुटका करुन घेण्यासाठी काहीजण  टोकाचा मार्ग अवलंबतात. अशीच एक भीषण घटना पुण्यात समोर आली आहे. पॅनकार्ड रोडवरील बानेर वस्तीमध्ये चार भटक्या कुत्र्यांना  जिवंत जाळण्यात आले तसेच 16 कुत्र्यांना विषप्रयोग करुन ठार मारण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले.  या प्रकारामुळे पुण्यातील प्राणी प्रेमींना मोठा धक्का बसला आहे. एएसीटी इंडिया या एनजीओच्या सदस्यांना तपासामध्ये कुत्र्यांच्या मृतदेहाचे जळालेले अवशेष तसेच कुजलेल्या अवस्थेतील कुत्र्यांचे  मृतदेह सापडले. 

एनजीओच्या सदस्यांना बानेर जवळच्या झुडपांमध्ये कुत्र्यांचे सापळेही सापडले. त्यामुळे यापूर्वीही या परिसरात मोठया प्रमाणावर भटक्या कुत्र्यांना ठार मारण्यात आले आहे. एएसीटी इंडियाच्या सदस्यांनी पुणे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. 28 सप्टेंबरला पुणे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. कुत्र्यांचे शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर बुधवारी एफआयआर दाखल करण्यात येईल. एएसीटी इंडियाच्या सदस्यांनी कुत्र्यांबरोबर झालेल्या या अमानुष कृत्याबद्दल परिसरातील नागरीकांशी चर्चा केली. त्यावेळी तिथल्या लोकांनी घटनास्थळाजवळ असलेल्या ऑफीसकडे बोट दाखवले. त्या ऑफीसशी संबंधित असलेल्या काहीजणांनी चार कुत्र्यांना रशीने बांधले. त्यांना 50 मीटरपर्यंत फरफटत नेले तिथे त्या कुत्र्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. 

कुत्र्यांचे मृतदेह जळून राख झाले होते. फक्त हाड आणि कवटीकडचा भाग सापडला. हेच अवयव शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. जेव्हा या कुत्र्यांना खेचून आणले तेव्हा ते मृतावस्थेत होते की, बेशुद्धावस्थेत त्याची खात्री नसल्याचे काही जणांनी सांगितले. या परिसरात आतापर्यंत 21 कुत्र्यांचे मृतदेह सापडले आहेत. 

एएसीटी इंडियाच्या प्रतिनिधी नीना राय यांनी सांगितले कि, 28 सप्टेंबरला जेव्हा मी पहिल्यांदा इथे आले त्यावेळी 100 मीटरच्या परिसरात मला दोन कुत्रे आणि कुत्र्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळले. आणखी तपास केल्यानंतर 11 कुत्र्यांचे मृतदेह सापडले. हे कुत्र्यांचे मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत होते. मागच्या काही वर्षात प्राण्यांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. मागच्या महिन्यात मुंबईत चेंबूरमध्ये एका गृहनिर्माण सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. 

टॅग्स :dogकुत्रा