शहरं
Join us  
Trending Stories
1
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
2
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
3
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
4
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
5
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
6
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
7
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
8
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
9
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
10
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
11
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
12
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
13
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
14
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
15
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
16
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
17
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
18
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
19
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
20
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्रीनिमित्त शिवशंभोचा गजर

By admin | Updated: February 25, 2017 02:38 IST

शहरातील मृत्युंजयेश्वर, ओंकारेश्वर, पाताळेश्वर, सिद्धेश्वर, नागेश्वर अशा विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्त आज दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या

पुणे : शहरातील मृत्युंजयेश्वर, ओंकारेश्वर, पाताळेश्वर, सिद्धेश्वर, नागेश्वर अशा विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्त आज दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. लघुरुद्र, महारुद्र, निषिद्धकालपूजा अशा विविध धार्मिक विधींनी महाशिवरात्र साजरी करण्यात आली.देवदेवेश्वर संस्थानाच्या मृत्युंजयेश्वर मंदिरात सकाळी १० वाजता लघुरुद्र पूजा करण्यात आली. आदल्या दिवशी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे डॉ. श्रीनंद बापट यांचे ‘शिवतांडवस्तोत्र’ या विषयावर व्याख्यान झाले. पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. रात्री १२.३० वाजता निषिद्धकालपूजा पार पडली, अशी माहिती प्रमुख विश्वस्त सुधीर पंडित यांनी दिली.ओंकारेश्वर मंदिरामध्ये गुरुवारी महारुद्र करण्यात आला. त्याची पूर्णाहुती शुक्रवारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते झाली. पहाटेपासून भाविकांचे अभिषेक सुरू होते. दिवसभरात जवळपास २५ हजार भाविकांना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते रात्री ८ वाजता आरती झाली. मध्यरात्रीनंतर करण्यात आलेल्या यामपूजेने महाशिवरात्र उत्सवाची सांगता झाली.भरत मित्र मंडळाने तलावातून शिवलिंग प्रगट होत असल्याचा हलता देखावा तयार केला. फरासखान्याजवळील आदर्श मंडळातर्फे २,१०० किलो बर्फाचा वापर करून शिवलिंग साकारण्यात आले होते. सायंकाळी आरती आणि प्रसादवाटप करण्यात आले. पाषाण येथील सोमेश्वर व जंगली महाराज रस्त्यावरील पाताळेश्वर मंदिरातही भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.