शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

बारामती मार्गावर आजपासून शिवशाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 06:59 IST

विनावाहक सेवा : स्वारगेटपासून दर अर्ध्या तासाला बस

पुणे : प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत असलेली वातानुकूलित शिवशाही बससेवा शनिवारपासून बारामती मार्गावर सुरू केली जाणार आहे. दर अर्ध्या तासाला स्वारगेट येथून हीबस सोडण्यात येणार असल्याची माहिती राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली. बारामती-पुणे-बारामती मार्गावर सध्या साध्या बसमार्फत विनावाहक-विनाथांबा ही सेवा पुरविली जात आहे. सध्या दर पंधरा मिनिटाला स्वारगेट व बारामती येथून बस उपलब्ध होते. ही बससेवा सुरू झाल्यापासून या मार्गावर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.अधिक उत्पन्न मिळवून देणारा हा मार्ग आहे. एसटीच्या ताफ्यात शिवशाही बस दाखल झाल्यानंतर बारामती मार्गावरही ही बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. उन्हाळ्यामुळे ही मागणी वाढली होती. तसेच सध्या शिवशाही सुरू असलेल्या सर्वच मार्गांवर चांगला प्रतिसाद मिळत असल्याने प्रशासनाने बारामती मार्गावरही वातानुकूलित शिवशाही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.शनिवारपासून (दि. २८) सकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेत विनावाहक-विनाथांबा सेवा सुरू केली जाईल. तर अर्ध्या तासाला या बस सोडण्यात येणार असून, दिवसभरात शिवशाहीच्या २६ फेऱ्या होतील. या बसला प्रौढ प्रवाशांसाठी १६१ रुपये, तर लहान मुलांसाठी ८२ रुपये तिकीटभाडे आकारण्यात येईल. या सुविधेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जोशी यांनी केले आहे.

टॅग्स :Bus Driverबसचालक