शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी समाजाचा जनसागर शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी शिवनेरीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 14:53 IST

आदिवासी समाजातील वीर पुरुषांनी प्रत्येक लढ्यात भाग घेऊन बलिदान दिले आहे,त्याकरिता प्रत्येक समाजबांधवांनी आपला स्वाभिमान जपला पाहिजे. संघटीत होऊन अन्याय, अत्याचाराविरोधात उभे राहणे गरजेचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते सतीशदादा पेंदाम यांनी जुन्नर येथे व्यक्त केले.

आनंद कांबळे /जुन्नर दि.4 - आदिवासी समाजातील वीर पुरुषांनी प्रत्येक लढ्यात भाग घेऊन बलिदान दिले आहे,त्याकरिता प्रत्येक समाजबांधवांनी आपला स्वाभिमान जपला पाहिजे. संघटीत होऊन अन्याय, अत्याचाराविरोधात उभे राहणे गरजेचे आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते सतीशदादा पेंदाम यांनी जुन्नर येथे व्यक्त केले. आदिवासी विचारमंच व संलग्न संघटनेच्या वतीने आयोजित अभिवादन मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड.योजनाताई वाजे या होत्या. भारत देशात आदिवासी  समाजावर अन्याय होत आहेत. बळजबरीने आदिवासी समाजाच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. आदिवासी  समाज या देशाचा मूळ समाज असून त्याची भाषा ही देशाची भाषा आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निकाल दिला आहे.  सन १६५० मध्ये शिवनेरी किल्ल्यावर कोळो महादेव व ठाकर समाजाच्या १६०० वीर पुरुषांनी उठाव केला, सरनाईक खेमा व त्याच्या सहकारी यांनी स्वराज्याच्यासाठी बलिदान दिले. या बलिदानाची आठवण म्हणून आपण आज एकत्र आलो आहोत. समाजासाठी सर्वानी मतभेद विसरुन एकत्र आले पाहिजे.असेही यावेळी पेंदाम यांनी मत व्यक्त केले.जुन्नर-शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी बलिदान करणाऱ्या आदिवासी विरांची कमी नव्हती. एक लढवय्या जमात म्हणून आदिवासी पुढे असायचे ,मात्र इतिहासकारांनी या जमातीला प्रसिद्धीपासून दूर ठेऊन त्यांची उपेक्षाच केली. निजमशाहीच्या ताब्यात असलेल्या शिवनेरी किल्यावर त्या वेळचा सरदार रणदुल्ला खान याने स्वराज्यासाठी लढणाऱ्या शूर आदिवासी जमातींना जरब बसावी म्हणून या भागातील शूर वीरांना पकडून 1600 आदिवासी शूर विरांची कत्तल करण्यात आली. पण अशा जरबेला घाबरेल तो आदिवासी कसला? या शूर विरांच्या अभिवादनासाठी  (रविवारी 3सप्टेबर ) रोजी स्मारकाजवळ संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी बांधव प्रचंड जनसमुदायाने एकत्र आले होते. महाराष्ट्र राज्य आदिवासी विचार मंच व त्यांच्याशी सलग्न असणाऱ्या महाराष्ट्रातील  विविध आदिवासी संगटना सहभागी झाल्या होत्या. या प्रसंगी जुन्नर शहरातुन महाराष्ट्रातील तमाम आदिवासी उपस्तित बांधवानी रॅलीने शिवनेरीवरील कोळी चबुत-याला अभिवादन करण्यात आले.