शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांचे दुर्मीळ पत्र सापडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 21:56 IST

शिवाजी महाराजांचा ‘शरणागतवत्सल’ हा एक वेगळाच पैलू या पत्राद्वारे पहावयास मिळतो.

ठळक मुद्दे हे कौलनामा स्वरुपातील पत्र शिवराज्याभिषेकापूर्वीचे राज चंद्रकांत मेमाणे यांना पुणे पुरालेखागार येथील पेशवे दप्तरात शिवाजी महाराजाचे हे पत्र सापडले

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशासनावरील पकड, एखाद्या प्रकरणाचा छडा लावण्याची पारदर्शक पध्दत याची प्रचिती देणारे दुर्मीळ पत्र भारत इतिहास संशोधक मंडळातील मोडी लिपीचे अभ्यासक राज चंद्रकांत मेमाणे यांना पुणे पुरालेखागार येथील पेशवे दप्तरात शिवाजी महाराजाचे हे पत्र सापडले आहे. ‘कौलनामा अजरख्तखाने राजेश्री सिवाजी राजे दामदौलतहू’ अशा फारसी मायन्याची सुरुवात असलेले हे कौलनामा स्वरुपातील पत्र शिवराज्याभिषेकापूर्वीचे आहे. शिवाजी महाराजांचा ‘शरणागतवत्सल’ हा एक वेगळाच पैलू या पत्राद्वारे पहावयास मिळतो.मेमाणे यांना पुणे पुरालेखागार येथील पेशवे दप्तरात शिवाजी महाराजाचे हे पत्र सापडले आहे. या संपूर्ण पत्राचे वाचन मेमाणे भारत इतिहास संशोधक मंडळाच्या आगामी पाक्षिक सभेत करणार आहेत. हे पत्र प्रकाशित करण्यासाठी त्यांना मोडी लिपीचे अभ्यासक मंदार लवाटे यांचे सहकार्य लाभले आहे.या पत्राबाबत माहिती देताना मेमाणे म्हणाले, ‘हे पत्र पुणे परगण्यातील जेजुरीच्या सुर्याजी पाटील माळवदकर यांना लिहिलेले आहे. या पत्रातील मजकुरावरून शिवाजी महाराजांची आपल्या प्रशासनावरील पकड किती मजबूत होती, हे समजून येते. शिवपूर्व, शिवकाल, पेशवेकाल आणि आंग्लकालीन असे मोडी पत्रांचे चार कालखंड मानले जातात. हे पत्र शिवकालीन आहे. मूळ पत्राची समकालीन नकल असलेले हे पत्र कौलनामा म्हणजेच आश्वासनपत्र या प्रकारात मोडते.’ हा कौलनामा सुहुर सन समान, खमसेन आणि अलफ म्हणजेच इसवी सन १६५७-५८ म्हणजेच महाराजांच्या राज्यभिषेकापूर्वी लिहिलेले आहे. या पत्रातील घटनेचा उल्लेख सातारा येथील छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या आज्ञापत्रात आणि थोरले बाजीराव पेशवे यांच्या अभयपत्रातही आढळून येतो, असेही मेमाणे यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजhistoryइतिहास