शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

शिवरायांना मानाचा मुजरा

By admin | Updated: February 20, 2015 00:27 IST

ढोलताशांचा दणदणाट...शाहिरांच्या पहाडी आवाजातील पोवाडे...भगवे फेटे...पारंपरिक पोशाख...तलवारबाजी, दांडपट्टा यांचे प्रात्यक्षिक..

ढोलताशांचा दणदणाट...शाहिरांच्या पहाडी आवाजातील पोवाडे...भगवे फेटे...पारंपरिक पोशाख...तलवारबाजी, दांडपट्टा यांचे प्रात्यक्षिक...स्वराज्यातील विविध नररत्नांच्या नावाचे आकर्षक रथ...अशा वातावरणात शहरात शिवजयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत तरुणाईने उत्साहात सहभाग घेतला. शहरातील विविध भागांमधून सकाळीच मिरवणुकांना प्रारंभ झाला. भवानी पेठेतील श्रीभवानी माता मंदिरातून सकाळी नऊ वाजता तर शिवजन्मोत्सव समितीतर्फे शनिवारवाड्यापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीमध्ये वीर बाजी पासलकर, कृष्णाजी नाईक बांदल, कान्होजी जेधे नाईक, मानाजी पायगुडे, तानाजी मालुसरे, हैबतराव शिळीमकर आदी स्वराज्यातील नररत्नांच्या नावाने रथ तयार करण्यात आले होते. त्यामध्ये पोवाडे, तलवारबाजी, दांडपट्टा खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले जात होते. हमाल पंचायत भवनपासून सकाळी १०.३० वाजता मिरवणूक काढण्यात आली. नाकात नथ, नऊवारी साडी नेसून महिलाही मोठ्या प्रमाणावर मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. महापालिकेतर्फे २२ फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. महापौर दत्तात्रय धनकवडे आणि आयुक्त कुणाल कुमार यांच्या हस्ते सकाळी पावणेआठ वाजता शिवाजीनगर येथील श्री शिवाजी प्रिप्रेटरी मेमोरिअल स्कूलच्या आवारातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. लाल महालातील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर सामुदायिक ध्वजवंदन करण्यात आले. ४महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीमधील २६ शैक्षणिक संस्थांच्या दहा हजार अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी भव्य मिरवणूक काढून शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. या वेळी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड, संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, एम.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष पी.ए. इनामदार, डॉ. एन.वाय. काझी उपस्थित होते. वडगांव-शेरी येथील आनंद श्री सोसायटीमध्ये शिवजयंतीनिमित्त लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. या वेळी हृषीकेश कवडे, राज जमादार, अभिषेक सव्वाशे, दर्शन म्हस्के, रोहित काळदंते, रोहन नवले, मंगेश देशमुख उपस्थित होते.४शिवसंग्राम शहर व जिल्ह्याच्या वतीने शहराच्या मध्यभागातून शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये अरबी समुद्रात होणाऱ्या नियोजित शिवस्मारकाच्या प्रतिकृतीचा रथ, शिवकालीन शस्त्रांचा रथ, ढोलपथकाचा समावेश करण्यात आला होता. या वेळी तुषार काकडे, शिवराज मोरे पाटील, रवींद्र भोसले, स्वप्निल खडके, भोलाशेठ वांजळे, सचिन कांबळे, तानाजी गंभीर, सागर फाटक, संजय ढोले उपस्थित होते.४शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला सामाजिक कार्यकर्ते शफी शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी खासदार व शहराध्यक्षा अ‍ॅड. वंदना चव्हाण, आनंद रिठे, शंकर शिंदे, शालिनी जगताप, समीर निकम, संजय लाड, आनंद कारंडे, सुरेश पवार, बाळासाहेब आहेर, दिनेश खैरे, योगेश वराडे, अविनाश वेल्हाळ उपस्थित होते.४अखिल भारतीय मराठा महासंघ शहरच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस नामदेवराव मानकर, शहराध्यक्ष अनिल मारणे, महिला अध्यक्ष मीना जाधव, युवक अध्यक्ष युवराज दिसले उपस्थित होते.४ कोथरूड ब्लॉक कॉंग्रेस कमिटी व अनिल बजाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समितीच्या वतीने शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी अ‍ॅड. राहुल म्हस्के, गिरीश गुरनानी, धनंजय शेवाळे, अमित जाधव, अ‍ॅड. अतुल म्हस्के, अमोल वाघमारे, युवराज म्हस्के, उमेश गिरासे, आशिष वाघमारे, अनिल सरगरे, विनायक वर्पे, प्रतिम पायगुडे उपस्थित होते.४ राष्ट्रवादी कॉंग्रेस, मोरया ग्रुप व शिवकृपा प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले सिंहगड येथून प्रज्वलीत करून आणलेल्या ज्योतीची फेरी काढण्यात आली. तसेच शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शहर उपाध्यक्ष वैभव पंचमुख, सुयोग कर्डिले, संतोष व्हाळकर, फिरोज खान, स्वप्निल मोरे, किसन तरटे, कृष्णा मोरे, अविनाश खांदवे, स्वप्निल नरवडे, दिगंबर देशमुख उपस्थित होते.४ अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयच्या वतीने संगीत नृत्य नाट्याद्वारे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला. अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सुनीता जगताप, उपाध्यक्ष संजीव जगताप, अ‍ॅड. दिलीप जगताप उपस्थित होते. ४ फुले-साठे-आंबेडकर विचार फाउंडेशनच्या वतीने मधुमेह, डेंग्यू व स्वाईन फ्लूचे तपासणी शिबिर तसेच लहान मुलांच्या विविध स्पर्धा आयोजित करून शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी फुले-साठे-आंबेडकर विचार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मोहन सोनवणे, शिरीष पुकाळे, आनंद रिठे, साधना सोनवणे, योगिता सावंत उपस्थित होते.४ स्मिता पाटील विद्यालयामध्ये जयंती व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस हार घालून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष प्रा. एस.आर. पाटील यांनी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चांगले मित्र बनवा व यशाची शिखरे हस्तगत करा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. या वेळी नगरसेविका भाग्यश्री दांगट, सामाजिक कार्यकर्ते दिलीप बराटे, विठ्ठलनगरचे अध्यक्ष संजय हिंगे, शांतता कमिटीचे हमीद शेख, मुख्याध्यापिका संजीवनी पाटील, मुख्याध्यापक संतोष तनपुरे, स्वाती पाटील उपस्थित होते.४ शहर महिला कॉंग्रेसच्या वतीने सोनाली मारणे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी सीमा सावंत, स्वाती कथलकर, गीता तारू, जया पारख, आरती गायकवाड उपस्थित होत्या. राष्ट्रीय समाज पक्ष पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या वतीने अध्यक्षा डॉ. उज्ज्वला हाके यांनी शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. या वेळी भांतब्रेकर, मंगला गोरखे, देवेंद्र धायगुडे, सयाजी पाटील, सचिन शेंडगे, तानाजी टकले, बाळासाहेब कोकरे, सुभद्रा धायगुडे उपस्थित होत्या.४ शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने कॉंग्रेस भवन येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास डॉ. अभय छाजेड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी नीता रजपूत, सचिन आडेकर, राजेंद्र भुतडा, शंकर राठोड, उमेश कंधारे, रामचंद्र भुवड, अतुल कारले, शशी बिबवे, रवींद्र म्हसकर, राजू गायकवाड उपस्थित होते.