शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

शिवसृष्टीवरून राष्ट्रवादीत दोन गट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:12 IST

बीडीपीच्या (जैवविविधता उद्यान) जागेवर शिवसृष्टी करण्याच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाले आहेत.

पुणे : येथे बीडीपीच्या (जैवविविधता उद्यान) जागेवर शिवसृष्टी करण्याच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाले आहेत. काँग्रेसने वेगळाच पवित्रा घेतला असून मुख्यमंत्र्यांनी हे केवळ गाजर दाखविले असल्याची टीका केली आहे. तर, भाजपाकडून ‘आम्ही कोणत्याही परिस्थितीत शिवसृष्टीची उभारणी करणारच,’ असे सांगण्यात येत आहे.शुक्रवारी (दि. ९) शिवसृष्टीच्या विषयावर महापालिकेत खास सभा होत आहे. सभेत या विषयावरचे सर्व राजकीय पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. भाजपाकडून श्रेय घेण्याचा, तर विरोधातील राष्टवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी कसे गाजर दाखविले आहे, यावर टीकाटिप्पणी रंगण्याची शक्यता आहे.मुंबई येथे झालेल्या महापालिकेतील सत्ताधारी व विरोधकांच्या संयुक्त बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी बीडीपीच्या जागेवर शिवसृष्टी व कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर मेट्रोचा डेपो, असा निर्णय जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, शिवसृष्टीसाठी प्रयत्नशील असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचेच नगरसेवक, माजी उपमहापौर दीपक मानकर हे या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांचा हा तोडगा मान्य केला असून, त्याचे स्वागतही केले आहे.मात्र, त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यानेच पर्यावरणाला हानिकारक असा हा निर्णय घ्यावा हे धक्कादायक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.खासदार चव्हाण या पर्यावरणाच्या खंद्या समर्थक असून बीडीपी आरक्षित जागेवर कसलेही बांधकाम करण्यास त्यांचा तीव्र विरोध आहे. त्यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील माजी सभागृह नेते बंडू केमसे यांनीही शिवसृष्टीला विरोध केला आहे. बीडीपीच्या जागेवर कसलेही बांधकाम करण्यास राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची मनाई आहे. त्यांचा आदेश रद्द करण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयालाच आहे; त्यामुळे बीडीपीच्या जागेवर शिवसृष्टी होऊच शकत नाही, असे त्यांनी सांगितले.>संपूर्ण जागा खासगी मालकीचीकाँग्रेसने याबाबत वेगळीच भूमिका घेतली आहे. महापालिकेतील काँग्रेसचे गटेनेते अरविंद शिंदे यांनी सांगितले, की या जागेवर शिवसृष्टी करणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे. संपूर्ण जागा खासगी मालकीची आहे. सुमारे २०० मालक तिथे आहेत. त्यांना नुकसानभरपाई कशी देणार, नियम कसे बदलणार, एका बीडीपीला एक नियम व दुसºयाला दुसरा, याचे समर्थन कसे करणार? असे प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केले. मुख्यमंत्र्यांनी बीडीपीच्या जागेवर शिवसृष्टी हे फक्त गाजर दाखविले, आहे असे शिंदे म्हणाले.>महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी विरोधी पक्ष काहीही म्हणत असले, तरी त्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी निर्णय जाहीर केला आहे, असे सांगितले. हे नेते काहीच बोलले नाहीत व आता मात्र ते टीका करीत आहेत, ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका त्यांनी केली.भाजपा कोणत्याही परिस्थितीत त्या जागेवर शिवसृष्टी करणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. भाजपाच्या वतीने शहरात अनेक ठिकाणी शिवसृष्टीचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे व पालिका पदाधिकाºयांचे अभिनंदन करणारे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.