पुणे :पुणे महापालिकेत सुरू झालेल्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत 'महाविकास' आघाडी करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला शिवसेनेच्या नगरसेवकांनी मतदान केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यात आणि केंद्रात भाजप - शिवसेना युती तुटली आहे. त्यामुळे अडीच वर्षांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेतही हेच चित्र बघायला मिळत आहे. पुण्यातही शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याचे बघायला मिळाले.
पुणे महापालिकेत 'महाविकास' आघाडी : शिवसेनेची काँग्रेस, राष्ट्रवादीला साथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 12:12 IST
राज्यातील नवीन बदलत्या राजकीय समीकरणांची पुण्यात नांदी.
पुणे महापालिकेत 'महाविकास' आघाडी : शिवसेनेची काँग्रेस, राष्ट्रवादीला साथ
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला शिवसेनेच्या नगरसेवकांनी मतदान केले