शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

पुण्यात अवतरला ‘शिवकाल’

By admin | Updated: February 20, 2017 03:06 IST

भारताच्या इतिहासात प्रथमच सुरू झालेल्या ५१ रणरागिणींंच्या महाराणी ताराराणी शौर्यपथकाचे मर्दानी खेळ, शिवगर्जना ढोलताशा

पुणे : भारताच्या इतिहासात प्रथमच सुरू झालेल्या ५१ रणरागिणींंच्या महाराणी ताराराणी शौर्यपथकाचे मर्दानी खेळ, शिवगर्जना ढोलताशा पथकाचे वादन आणि ‘मतदान करा, उज्ज्वल भविष्य घडवा’ अशा फलकांद्वारे करण्यात आलेली मतदान जनजागृती, शिवकालीन मर्दानी युद्धकलेची कोल्हापूर व पुण्यातील नामांकित पथकांची प्रात्यक्षिके. पारंपरिक पोशाखात महिला आणि शिवभक्तांनी केलेला ‘जय शिवाजी जय भवानी’चा जयघोष, अशा वातावरणात शिवकाल पुन:श्च एकदा पुण्यामध्ये अवतरला.निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या मिरवणुकीचे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, करवीर संस्थानाचे यौवराज शहाजीराजे संभाजीराजे छत्रपती, मिस्टर युनिव्हर्स संग्राम चौगुले, रिंकल अमित गायकवाड तसेच समितीच्या महिला सदस्यांच्या हस्ते लाल महालातील जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून जिजाऊ-शहाजी रथावरील शिवज्योत प्रज्वलन करीत मिरवणुकीला सुरुवात झाली. संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, अतिरीक्त आयुक्त राजेंद्र जगताप, अ‍ॅड. प्रताप परदेशी, पराग मते, प्रवीण परदेशी उपस्थित होते.सोहळ्याचे नियोजन गिरीश गायकवाड, दीपक घुले, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, दत्ताभाऊ पासलकर, शंकर कडू, दिग्विजय जेधे, महेश मालुसरे, रणजीत शिंदे, नीलेश जेधे, गोपी पवार, अनिल पवार, समीर जाधवराव, दीपक बांदल, किरण देसाई, मयूरेश दळवी, तुषार जगताप, मंदार मते, गोविंद पाटील आदींनी केले. एसएसपीएमएस शाळेच्या प्रांगणातील श्री शिवछत्रपतींच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. युवराज शहाजीराजे संभाजीराजे छत्रपती, ईशान अमित गायकवाड, रिंकल अमित गायकवाड, सुभाष सरपाले यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली. (प्रतिनिधी)गौरवशाली इतिहासमिरवणुकीत जिजाऊशहाजी शिवज्योत रथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार कृष्णाजी नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, सरदार नरवीर तानाजी मालुसरे, मानाजी पायगुडे, कान्होजी कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, नाईक निवंगुणे, जैताजी नाईक करंजावणे, कडू शिक्केकरी, अढळराव बाबाजी डोहर धुमाळ, सूर्याजी काकडे, सरलष्कर सरसेनापती हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, सरदार गोदाजी जगताप, सिधोजी थोपटे, झुंजारराव मरळ, शितोळे सरकार, तोरणा किल्लेदार गोदाजी भुरूक, सरनोबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार घराणे, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सुभेदार खंडोजी माणकर, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे, गंभीरराव, सप्तसहत्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, हिंमतबहाद्दर विठोजी चव्हाण, भोई बांधव, श्रीमंत सरदार लखुजीराजे जाधवराव, गरूड घराणे, चंद्रवंशी (भोपतराव) श्रीमंत सरदार लुखजीराव घारे, महाशक्तीशाली सरदार संभाजी काटे, सरदार निंबाळकर घराणे, जगद्गुरू संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज भक्ती शक्ती स्वराज्यरथ, श्रीमंत हरजीराजे महाडीक, महाशक्तीशाली रणमर्द सरदार संभाजी कोंढाळकर, श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला धारदेवास, महाराष्ट्राचे श्रीमंत पवार घराणे, समशेर बहाद्दर श्रीमंत दमाजीराव गायकवाड सरकार, श्रीमंतमहाराज महादजी शिंदे सरकार या स्वराज्यघराण्यांचे रथ त्यांचा गौरवशाली इतिहास सांगत सहभागी झाले होते.जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन४जिल्हा प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी निवडणूक समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, तहसीलदार उमेश पाटील यांच्यासह विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.रक्तदान शिबिर४मराठवाड्यातील महाविद्यालयीन तरुणांनी एकत्र येऊन शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. एरंडवण्यातील घनवट बिल्डिंगमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये ५१ जणांनी रक्तदान केले. या वेळी शिवतेज मराठवाडा मित्रमंडळातर्फे रक्तदात्यांना ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक आणि गुलाबपुष्प भेट स्वरूपात देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन श्रीकांत जाधव यांनी केले होते. सूरज बारगुले, विश्वजित यादव, महेश कवडे, ओम चाळक, शंकर डंबरे उपस्थित होते. शिवरायांचे विचार कृतीत यावेतपुणे : ससून रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी चंदनवाले म्हणाले, ‘छत्रपती शिवाजीमहाराजांचे चरित्र जगाला वंदनीय आहे. शिवराय हे सद्गुणांचा सागर होते. आज त्यांच्या विचारांचे प्रत्यक्ष कृतीत आणणे गरजेचे आहे. समाजकार्यासाठी सर्वांना एकत्र येण्याची आवश्यकता आहे. शिवजयंती साजरी करण्याच्या माध्यमातून हे सत्कार्य साध्य होईल.’ डॉ. अरुण कोवाळे, डॉ. किरणकुमार जाधव, डॉ. मनजित संत्रे, डॉ. सोमनाथ सलगर, राजश्री कोरके, शारदा गाडेकर, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.मुलांना खाऊ-खेळणी वाटपसाम्राज्य प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त ममता फाउंडेशनला भेट देण्यात आली. तेथील एचआयव्हीग्रस्त मुलामुलींना खेळणी व खाऊवाटप करून त्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी साम्राज्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते गौरव पवार, अक्षय राजे, ओंकार पाटील, सूरज कदम, अभय यादव, अमोल घार्गे, आकाश माने आदी उपस्थित होते.