येथील स्व. सुरेश गांधी चौकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्राचे युवक आघाडी अध्यक्ष परशुराम वाडेकर, सामाजिक कार्यकर्ते राहुल कांबळे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास फुलांचा हार अर्पण करण्यात आला.
कार्यक्रमास रिपाईं शिवाजी नगर मतदार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम,उपाअध्यक्ष संदीप तायडे, रिपाईं खडकी विभाग अध्यक्ष प्रवीण गायकवाड, खडकी विभाग अध्यक्ष रिकेश पिल्ले, महिला अध्यक्षा श्वेता जाधव, कार्याध्यक्षा सीमा अरीकस्वामी, सागर गायकवाड, यश अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते दादा कचरे आदी उपस्थित होते. नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आली. ॲड. ज्ञानेश जावीर यांनी सूत्रसंचालन केले.