शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरच्या बालगृहातील मुली असुरक्षित

By admin | Updated: June 2, 2015 04:57 IST

तब्बल सहा वर्षांपासून शासनाला शिरूरच्या बालगृहासाठी निवासी अधीक्षिका मिळालेली नाही. मुलींची काळजी घेणारी कोणतीही महिला अधिकारी नसल्याने

शिरूर : तब्बल सहा वर्षांपासून शासनाला शिरूरच्या बालगृहासाठी निवासी अधीक्षिका मिळालेली नाही. मुलींची काळजी घेणारी कोणतीही महिला अधिकारी नसल्याने येथील वरिष्ठ बालगृहातील मुलींची सुरक्षितता धोक्यात आली आहे. शासनाला जाग येणार तरी कधी? असा प्रश्न सामाजिक संघटना व पालकांनी केला आहे. शासकीय मुलींचे वरिष्ठ बालगृहात वर्ग-२च्या अधीक्षिका (निवासी) नियुक्तीसंदर्भात महिला बालकल्याण विभागाचे आयुक्त राजेंद्र चव्हाण यांनी दिलेले आश्वासनही हवेत विरून गेले. अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे २००८ पासून या बालगृहात निवासी अधीक्षिका नाही.यशस्विनी सामाजिक अभियानाच्या शिष्टमंडळाने मागील महिन्यात (एप्रिल) चव्हाण यांची भेट घेऊन निवासी अधीक्षिका तातडीने नियुक्त करा, अशा मागणीचे निवेदन त्यांना दिले होते. निवासी अधीक्षिका नसल्याने बालगृहातील दोन गतिमंद मुलींवर झालेला लैंगिक अत्याचार, तसेच मुलींची असुरक्षितता याबाबतही शिष्टमंडळाने चव्हाण यांना अवगत केले होते. यावर एप्रिलच्या महिनाअखेरपर्यंत निवासी अधीक्षिका नियुक्त करतो, असे आश्वासन आयुक्त चव्हाण यांनी शिष्टमंडळास दिले होते. जून महिना उजाडला तरी निवासी अधीक्षिका अद्याप नियुक्त करण्यात आली नाही. शिष्टमंडळाने चव्हाण यांच्याशी एकदा संपर्क साधला, मात्र तेव्हाही फक्त आश्वासनच मिळाले. चव्हाण यांच्याशी कार्यालयाच्या फोनवर अनेकदा संपर्क साधला, मात्र ते बिझी असल्याचे सांगण्यात आले. मोबाईल नंबर मागितला असता. नंबर देण्यास साहेबांनी मनाई केल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले.अधिकारी या बालगृहाबाबत गंभीर नाहीत, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. मात्र, मुलींना जो त्रास सहन करावा लागत आहे. त्याची अधिकाऱ्यांना जराही जाणीव नसल्याचे दिसते. मार्च महिन्यात गॅस सिलिंडर नसल्याने मुलींना ८ ते १० दिवस फक्त डाळभात जेवणास देण्यात येत होते. मुलींनीच ही बाब उघड केली होती. मागील महिन्यात बालगृहाच्या प्रवेशद्वाराच्या आत शिरल्यानंतर डाव्या बाजूस असणारी झाडे तोडण्यात आली. आम्हाला झाडे लावायला सांगता आणि तुम्हीच झाडे तोडता, असे काही मुली म्हणाल्या असता, त्या मुलींना मारहाणही करण्यात आली. अशाप्रकारे मुलींवर अत्याचार केले जातात. (वार्ताहर)