शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरचा पाणीपुरवठा अखेर सुरळीत

By admin | Updated: April 19, 2016 01:07 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात पाणी आल्याने शहराचा पाणीपुरवठा आज सुरळीत करण्यात आला. पुन्हा समस्या निर्माण होऊ नये म्हणून दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार

शिरूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात पाणी आल्याने शहराचा पाणीपुरवठा आज सुरळीत करण्यात आला. पुन्हा समस्या निर्माण होऊ नये म्हणून दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. टंचाईच्या काळात नागरिकांची, तसेच विविध पक्ष व नेत्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल नगर परिषद या सर्वांची आभारी असल्याचेही लोळगे म्हणाल्या.बंधाऱ्यातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने आठवडाभरापासून शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. बंधारा कोरडा पडला होता. मात्र, वरील बंधारे पाण्याने भरले होते. या बंधाऱ्याचे ढापे काढून पाणी खाली आणण्यासाठी गेली अठवडाभर नगर परिषदेने प्रयत्न केले. अखेर पाणी काल रात्री बंधाऱ्यात पोहोचले. दरम्यानच्या काळात आमदार बाबूराव पाचर्णे यांनी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा केला. तहसीलदार राजेंद्र पोळ, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे लोळगे यांनी सांगितले. माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, घोडगंगा सहकारी, तसेच व्यंकटेश साखर कारखान्यातर्फे शहरात दहा पाण्याचे टँकर पुरवल्याबद्दल लोळगे यांनी त्यांचेही आभार मानले. पाण्याचे टँकर पुरवणाऱ्या शिवसेनेचे शहरप्रमुख संजय देशमुख, भाजपाचे शहरप्रमुख केशव लोखंडे, समता परिषदेचे किरण बनकर, तसेच शरद परदेशी यांचेही पत्रकार परिषदेत आभार मानण्यात आले. सभापती जाकीरखान पठाण म्हणाले, गेली ८ दिवस पाणीपुरवठा विभागाने बंधाऱ्यात पाणी आणण्यासाठी प्रयत्न केले. स्वच्छता आरोग्य समिती सभापती रवींद्र ढोबळे, पाणीपुरवठा विभाग प्रमुख भगवान दळवी, आरोग्य निरीक्षक डी. टी. बर्गे, पाणीपुरवठा विभागाचे लिंबाजी कोकरे, संजय कुंभार, अप्पा पोटघन यांनी यासाठी परिश्रम घेतले. मुख्याध्याधिकारी डॉ. विजय थोरात, अशोक पवार उपस्थित होेते.