शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

शिरूर तालुक्यामध्ये ४ ग्रामपंचायतींत सत्ताबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:36 IST

शिरूर तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींच्या लागलेल्या निकालात ४ ग्रामपंचायतींमध्ये सत्ताबदल झाला आहे. शिरूरसह आंबेगाव तालुक्याचे लक्ष लागलेल्या रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीमध्ये गेल्या १० वर्षांची शेखर पाचुंदकर व मानसिंग पाचुंदकर यांच्या नेतृत्वाखालील सत्ता उलथवून टाकण्यात विरोधकांना यश मिळाले.

शिरूर - तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींच्या लागलेल्या निकालात ४ ग्रामपंचायतींमध्ये सत्ताबदल झाला आहे. शिरूरसह आंबेगाव तालुक्याचे लक्ष लागलेल्या रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीमध्ये गेल्या १० वर्षांची शेखर पाचुंदकर व मानसिंग पाचुंदकर यांच्या नेतृत्वाखालील सत्ता उलथवून टाकण्यात विरोधकांना यश मिळाले.तालुक्यातील रांजणगावसह करडे, आंबळे, चव्हाणवाडी, ढोक सांगवी तसेच कळवंतवाडी या ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतमोजणी झाली. यात रांजणगाव, करडे, आंबळे व कळवंतवाडी या ग्रामपंचायतींमध्ये सत्ताबदल झाला. यामध्ये रांजणगाव ग्रामपंचायतीकडे सर्वांचेच विशेष लक्ष लागले होते. या ग्रामपंचायतीवर माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर व शिरूर आंबेगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती.पाचुंदकर यांच्या पॅनलच्या सरपंचपदाचे उमेदवार दत्तात्रय पाचुंदकर यांचा विरोधी पॅनलचे उमेदवार सर्जेराव खेडकर यांनी अवघ्या १६ मतांनी पराभव केला. सतरा सदस्यांपैकी विरोधकांना १६, तर पाचुंदकरांच्या पॅनलला एकमेव जागेवर समाधान मानावे लागले.ढोक सांगवी ग्रामपंचायतीमध्ये मल्हारी मलगुंडे यांनीआपल्या नेतृत्वाखालील सत्ता अबाधित राखण्यात यश मिळविले. त्यांच्या पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार शोभा शेलार यांनी विरोधी पॅनलच्या प्रियांका जगताप यांचा पराभव केला. तीन जागांसाठी झालेल्या मतदानात तिन्ही जागा मलगुंडेंच्या पॅनलला मिळाल्या.आमदार पाचर्णे यांचे स्वीय सहायक पराभूतआंबळे ग्रामपंचायतीत आमदार बाबूराव पाचर्णे यांचे स्वीय सहायक महेश बेंद्रे हे सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले. सोमनाथ बेंद्रे यांनी त्यांचा पराभव केला. सोमनाथ यांचे ६ सदस्यदेखील निवडून आले. या ग्रामपंचायतीमध्येही सत्ताबदल झाला.करडे ग्रामपंचायतीत विद्यमान सत्ताधाऱ्यांना झटका बसला. त्यांचे सरपंचपदाचे उमेदवार राजेंद्र गायकवाड पराभूतझाले. मात्र, ११ पैकी त्यांचे९ सदस्य निवडून आले. सुनील इसवे हे सरपंचपदी निवडून आले.जि.प. निवडणुकीत ज्यांनी आमदार पाचर्णे यांच्या मुलाचा पराभव केला, ते राजेंद्र जगदाळे यांनी सत्ताधारी पॅनलचे नेतृत्व केले; मात्र त्यांना आपल्या पॅनलचा सरपंच निवडून आणता आला नाही.चव्हाणवाडी -लंघेवाडी ग्रामपंचायतीत संतोष लंघे सरपंचपदी निवडून आले. त्यांनी संदीप लंघे यांचा पराभव केला. सरपंच लंघे यांचे ७ पैकी ५ सदस्य निवडून आले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकPuneपुणे