शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर लोकसभेची जागा भाजपाला द्यावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 02:07 IST

मागील १५ वर्षांत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकप्रतिनिधी म्हणून कुठलेही भरीव काम केले नाही.

मंचर : मागील १५ वर्षांत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लोकप्रतिनिधी म्हणून कुठलेही भरीव काम केले नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपाची ताकद वाढली असून हा मतदारसंघ भाजपाला मिळावा अशी मागणी भारतीय जनता पक्ष ओबीसी सेलचे उपाध्यक्ष विकास रासकर यांनी केली. शिवसेना-भाजपा युती झाल्यास ही जागा सेनेला गेल्यास येथील उमेदवार बदलण्याची मागणीही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.मंचर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रासकर म्हणाले ३ वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आढळराव पाटील यांनी अपेक्षित कामे केलेली नाहीत.मतदारसंघात प्राधान्य क्रमाने जी कामे अपेक्षित आहेत ती झालेली नाही.वाघोली- शिक्रापूर परिसरात वाहतुक कोंडी कायम आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आढळराव पाटील स्ट्रॉग भूमिका घेत नाही. अष्टविनायक तसेच भिमाशंकर रस्त्याचे रुंदीकरण झाले नसून पुणे- नाशिक महामार्ग रखडला आहे.खेड तालुक्यातील विमानतळ केवळ आढळराव पाटील यांच्यामुळे पुरंदरला गेले असा आरोप करुन रासकर म्हणाले विमानतळ होण्यासाठी कोणतीही बाधा नव्हती. परंतू आढळराव पाटील यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे विमानतळ होवू शकले नाही. शिरुर लोकसभा मतदार संघ भाजपा ला मिळावा अशी मागणी आम्ही केली आहे.या मतदार संघात भाजपची ताकद वाढली आहे. भाजपाचे ३ आमदार व असंख्य नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपला हा मतदारसंघ मिळाला पाहिजे. भाजपा येथून प्रबळ उमेदवार देणार असून मी स्वत: दावेदार असल्याचे रासकर यांनी सांगितले.